रुग्णालयांत मृत्यूसत्र पण मुख्यमंत्री कुठेही नाहीत, जबाबदारी ढकलू नका: आदित्य ठाकरे

By संतोष हिरेमठ | Published: October 9, 2023 01:10 PM2023-10-09T13:10:08+5:302023-10-09T13:12:31+5:30

मृत्यूमागील कारणे शोधली पाहिजे. राजकीय वर्ग म्हणून आम्ही डीन सोबत आहोत.

Chief Minister was nowhere to be seen when the patients were dying, don't push the responsibility - Aditya Thackeray | रुग्णालयांत मृत्यूसत्र पण मुख्यमंत्री कुठेही नाहीत, जबाबदारी ढकलू नका: आदित्य ठाकरे

रुग्णालयांत मृत्यूसत्र पण मुख्यमंत्री कुठेही नाहीत, जबाबदारी ढकलू नका: आदित्य ठाकरे

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील परिस्थितीसमोर आल्यानंतरही मुख्यमंत्री कुठेही दिसले नाहीत. आरोग्यमंत्री तर म्हणाले, ही आमची जबाबदारी नाही,पूर्ण मंत्रिमंडळाची आहे. राजीनामा देणार नाही, कारण हिंम्मत नाही, पण जबाबदारी ढकलू तरी नका, असे असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) ते आले. घाटीतील रुग्ण संख्या, औषधांची मागणी,उपलब्ध साठा, रुग्णांकरिता सुविधा व रिक्त पदे याबाबत त्यांनी अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , किशनचंद तनवाणी,  वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय कल्याणकर , डॉ. अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, मृत्यूमागील कारणे शोधली पाहिजे. राजकीय वर्ग म्हणून आम्ही डीन सोबत आहोत. नांदेड येथे राजकारणासाठी खासदारांनी केलेला स्टंट दुर्दैवी आहे

Web Title: Chief Minister was nowhere to be seen when the patients were dying, don't push the responsibility - Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.