शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसला, एकनाथ शिंदेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 17:33 IST

पन्नास आमदार सत्तेला ठोकर मारून बाहेर पडले. कारण शिवसेनेचे खच्चीकरण होत होते.

 

वैजापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीला मतदान करणाऱ्या जनतेचा त्यांनी विश्वासघात केला आहे. काँग्रेसचे राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. मग अशा लोकांच्या हातात देश देण्यापेक्षा पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या हातात देश द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी वैजापूर येथे केले. लोकसभेच्या तीनही टप्प्यात महायुती बाजी मारत आहे, असे ते म्हणाले.

महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर शिंदे यांची जाहीर सभा झाली. सभेला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार व उदय सामंत, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पन्नास आमदार सत्तेला ठोकर मारून बाहेर पडले. कारण शिवसेनेचे खच्चीकरण होत होते. शिवसैनिकांना दुय्यम वागणूक मिळत होती. या पार्श्वभूमीवर सत्तांतर झाले. सत्ता येते, जाते पण नाव एकदा गेले की परत येत नाही, हे बाळासाहेबांचे शब्द होते. शिवसेनेचे दुकान बंद करेन पण काँग्रेससोबत जाणार नाही, हे बाळासाहेबांचे विचार होते. पण हे विचार सोडून जनतेचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम कुणी केले? सत्तेसाठी शिवसेना संपत असताना उघड्या डोळ्यांनी बघत राहण्याचे काम त्यांनी केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची विचारपूस करतात. महायुतीच्या सरकारने दोन वर्षांत शेतकरी, कष्टकरी, महिलांसाठी अनेक योजना आणल्या, असे ते म्हणाले. संविधान बदलण्याची अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असेही शिंदे म्हणाले. संदिपान भुमरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली. त्यांनी वीस वर्षांच्या काळात एकही काम केले नाही. वीस वर्षे केंद्रात असूनही खैरे यांना केंद्राची एकही योजना माहिती नाही, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकात आ. रमेश बोरनारे यांनी वैजापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तालुक्यातील रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचे कर्ज कॅबिनेटच्या शेवटच्या बैठकीत माफ केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी कैलास पाटील, संजना जाधव, एकनाथ जाधव, डॉ. दिनेश परदेशी, कल्याण दांगोडे, साबेर खान, पंकज ठोंबरे आदी उपस्थित होते.

नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडणारनांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. वैजापृूरचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. मराठवाडा वाॅटर ग्रीडच्या माध्यमातून घरोघरी पाणी मिळणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

ही आनंदाची बाबमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर नावावर शिक्कामोर्तब केले ही आनंदाची बाब आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजीनगरवर विशेष प्रेम होते. मुंबई, ठाण्यानंतर या वाघाने संभाजीनगरमध्ये डरकाळी फोडली होती, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेaurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४