शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

छत्रपती संभाजीनगरच्या सर्वात मोठ्या दरोड्याचा उलगडा; पाच जण ताब्यात, दीड किलो सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:31 IST

मास्टरमाइंडसह आणखी तिघे जण फरार असून गुन्हे शाखा त्यांचा शोध घेत आहे

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्याचा गुन्हे शाखा पोलिसांनी ११ दिवसांत छडा लावला. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये एका हॉटेल चालकाचा सहभाग निष्पन्न झाल्यावर त्यालाही उचलले. या गुन्ह्यात पावणे दोन किलो सोने-चांदीचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण मास्टरमाइंडसह आणखी तिघे जण सापडलेले नाहीत.

उद्योजक लड्डा हे ७ मे रोजी कुटुंबीयांसह अमेरिकेला गेले होते. १९ वर्षांपासूनचा विश्वासू कामगार संजय झळके (रा. वळदगाव) याला केअरटेकर म्हणून बंगल्यावर ठेवले होते. १५ मे रोजी पहाटे २ ते ४ वाजेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर बंगल्यातून साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी, असा ६ कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यावर तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. दहा दिवसांपासून गुन्हे शाखेचे ७ आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील २, अशी ९ पथके तपास करीत होती. या पथकांनी दरोड्याचा छडा लावला असून, वडगाव कोल्हाटीत एकाला उचलले. त्याच्याकडून दीड किलो सोने जप्त केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. अधिक तपशील पोलिसांनी दिला नाही.

तपासावरून पोलिसांमध्ये गटबाजीया गुन्ह्याच्या तपासावरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा यांच्यात गटबाजी दिसून आली. सुरुवातीला तपास एमआयडीसी वाळूज पोलिसांकडे होता. दुसऱ्याच दिवशी हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. त्यानंतर पोलिस ठाण्याकडून गुन्हे शाखेला सहकार्य मिळाले नाही. त्यातच गुन्हे शाखेकडूनही एमआयडीसी वाळूज पोलिसांना विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुन्ह्याची उकल होण्यास उशीर झाल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRobberyचोरी