शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आमदारासाठी कसले नियम? विलास भुमरेंनी मुलाला थेट EVM जवळ नेलं; बोटाला शाईही लावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:09 IST

आमदाराच्या मुलानेही दाबलं EVM चं बटण? पाचोडमधील व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ.;जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान पैठणचे शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी चक्क आपल्या लहान मुलासह मतदान केंद्रात प्रवेश करून नव्या वादाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, भुमरे यांनी मुलाला केवळ मतदान यंत्राजवळ नेलेच नाही, तर तेथील कर्मचाऱ्याकडून मुलाच्या बोटाला शाईदेखील लावून घेतली. या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशीचे आदेश दिले असून केंद्राध्यक्षांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

नेमका प्रकार काय? पाचोड जिल्हा परिषद गटात आमदार भुमरे यांचे चुलत बंधू शिवराज भुमरे निवडणूक लढवत आहेत. या गटात मतदानासाठी गेलेल्या विलास भुमरे यांनी आपल्या चिमुकल्या मुलाला सोबत नेले होते. मतदान करताना त्यांनी मुलाला ईव्हीएम मशीन जवळ उभे केले. त्यानंतर वडिलांच्या बोटाला शाई लावत असल्याचे पाहून मुलानेही बोट पुढे केले आणि तेथील महिला कर्मचाऱ्याने नियमांचे उल्लंघन करत मुलाला शाई लावली.

खासदार भुमरेंची 'अजब' प्रतिक्रियाया घटनेनंतर राजकीय वर्तुळातून टीका होत असताना, खासदार संदीपान भुमरे यांनी मात्र हात झटकले आहेत. "ते लहान लेकरू आहे, मी तिथे नव्हतो, मला याबद्दल काहीही माहिती नाही," अशी अजब प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र, निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाला जाब विचारला आहे.

कारवाईचा बडगा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, "हा प्रकार अतिशय गंभीर आहे. मतदान केंद्रातील गोपनीयतेचा आणि नियमांचा भंग झाला आहे. या घटनेची पूर्ण चौकशी करून कारवाई केली जाईल."

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Vilas Bhumre's son taken to EVM, ink applied; controversy.

Web Summary : MLA Vilas Bhumre sparked controversy by taking his son to an EVM during voting and getting ink applied to the child's finger. District Collector ordered an inquiry, vowing action for violating election rules. Sandipan Bhumre denied knowledge.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर