शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लाडसावंगी गटात चार उमेदवार परस्परांचे नातलग; पाहुण्यारावळ्यांची मतेच निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:05 IST

छत्रपती संभाजीनगरमधील लक्षवेधी लढत: उमेदवारांना मतदान करण्यासाठी दररोज दहा-बारा फोन पाहुण्यारावळ्यांकडून येत आहेत. आपल्या पाहुण्यांना मतदान करा, असे सांगितले जात आहे.

लाडसावंगी (छत्रपती संभाजीनगर) : गटातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक रंगतदार टप्प्यावर आहे. नात्यागोत्यातील मतदारांचा कल ज्या उमेदवारांच्या पारड्यात जाईल, तोच उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय आरोप - प्रत्यारोपांमुळे या गटातील प्रचाराकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लाडसावंगी गट हा सर्वसाधारण सुटला होता. शिवाय छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बहुतांश गट आरक्षित झाल्याने तालुक्यातील मातब्बर नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे हे लाडसावंगी गटात भाजपकडून इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने आ. अनुराधा चव्हाण यांच्यावर आरोप करत त्यांनी शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. शिवाय लाडसावंगी गटातील भाजपचे उमेदवार विजय काळे, काॅंग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पठाडे, राष्ट्रवादी (अजित पवार)चे उमेदवार बाबासाहेब म्हस्के हे चारही उमेदवार एकमेकांचे नातेवाईक आहेत. मात्र यात ज्यांच्या पारड्यात नातेवाईकांचे मतदान जाईल, तोच उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

प्रचार थंडावला मात्र...गुरुवारी प्रचार संपला असला तरी आता प्रत्यक्ष भेटींवर भर दिला जाणार आहे. अनेक मतदारांना आता लक्ष्मी दर्शन होईल का? अशी आस लागलेली आहे. लाडसावंगी गटात एकूण ३२,१३० मतदार असून, यात १६,९९५ पुरुष तर १५,१३५ महिला मतदार आहेत.

एरव्ही कधी ख्यालीखुशाली विचारली का?उमेदवारांना मतदान करण्यासाठी दररोज दहा-बारा फोन पाहुण्यारावळ्यांकडून येत आहेत. आपल्या पाहुण्यांना मतदान करा, असे सांगितले जात आहे. एरव्ही कधीही फोन आला नाही. आता मात्र पहिले ख्यालीखुशाली विचारायची, नंतर मतदान करा म्हणून सांगायचे, असे प्रकार सुरू आहेत. पाहुण्यांच्या फोनचा वैताग आल्याचे अनेक मतदारांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Relatives clash in Ladsaongi election; kin votes to decide winner.

Web Summary : Ladsaongi's Zilla Parishad election sees four relatives vying for votes. Shifting loyalties impact the race, now focused on direct voter contact, with many hoping for monetary incentives. Relatives are heavily pressuring voters.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर