शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिंदेसेना ठरली 'मोठा भाऊ', भाजपचीही दमदार कामगिरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 19:32 IST

महायुतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद खिशात घातली; मविआचा सुपडा साफ

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेच्या ६३ जागांसाठी झालेल्या रणधुमाळीचा निकाल जाहीर झाला असून, ग्रामीण भागातील मतदारांनी महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. शिंदेसेनेने २४ जागांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, भाजपने २२ जागांवर विजय मिळवत त्यांना भक्कम साथ दिली आहे. या निकालामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला असून, महाविकास आघाडीला मोठा राजकीय हादरा बसला आहे.

कुठे जल्लोष, कुठे धक्कादायक पराभव! या निवडणुकीत सर्वात मोठा विजय पैठण आणि सिल्लोड तालुक्यात पाहायला मिळाला. पैठणमध्ये खासदार संदिपान भूमरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेने ९ पैकी ८ जागा जिंकून विरोधकांचे पानिपत केले. सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या चिरंजीवांसह ६ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

माजी आमदारांना धक्कामात्र, दुसरीकडे दोन माजी आमदारांच्या पत्नींना पराभवाचा धक्का बसला आहे. उदयसिंग राजपूत आणि संजय वाघचौरे यांच्या पत्नींचा पराभव हा या निवडणुकीतील सर्वात मोठा 'अपसेट' मानला जात आहे.

घराणेशाहीची सरशी, आमदारांची धाकधूक निवडणुकीत अनेक नेत्यांच्या वारसांनी आपली ताकद दाखवली. अब्दुल आमेर, शिवराज भूमरे, निखिल चव्हाण आणि मीनाक्षी पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. आमदार प्रशांत बंब आणि अनुराधा चव्हाण यांनी आपले बालेकिल्ले सुरक्षित राखले असले, तरी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे आणि कन्नडच्या आमदार संजना जाधव यांना मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही.

जिल्हा परिषदेतील अंतिम पक्षीय बलाबल (एकूण ६३ जागा):

शिवसेना (शिंदे): २४ (१ पुरस्कृत)

भाजप: २२ (१ पुरस्कृत)

उद्धवसेना: ०९

राष्ट्रवादी (अजित पवार): ०४

काँग्रेस / राष्ट्रवादी (श.प.) / प्रहार / अपक्ष: प्रत्येकी ०१ जागा

मागच्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल:भाजप- २३, एकत्र शिवसेना- १८, काँग्रेस- १६, एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस- ३, अपक्ष- २, एकूण ६२

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's Shiv Sena Dominates Aurangabad Zilla Parishad, BJP Supports

Web Summary : Shinde's Shiv Sena secured 24 seats in Aurangabad Zilla Parishad elections, with BJP winning 22. This victory paves the way for a Mahayuti alliance government, dealing a blow to the Maha Vikas Aghadi. Dynastic politics thrived; some experienced upsets occurred. The final tally shows a clear shift in power.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर