शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर-पुणे मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, २ हजार कोटींतून होणार नूतनीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 12:02 IST

छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा; टोल वसुली संपताच मार्ग एमएसआयडीसीकडे हस्तांतरित होणार

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर - अहिल्यादेवीनगर मार्गे पुणे या विद्यमान मार्गाचे २ हजार कोटी ५० लाख रुपयांतून नूतनीकरण करण्यात येणार आहे. या मार्गावर चारचाकी कार वगळता इतर वाहनांकडून सध्या टोलवसुली सुरू असून, ती संपताच मार्ग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येईल, तसेच मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय गुरुवारी शासनाने घेतला.

सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुणे ते शिरुर हा ५३ कि.मी.चा मार्ग सहा पदरी करण्यात येणार असून, एमएसआयडीसीमार्फत हे काम होईल. यासाठी ७ हजार ५१५ कोटी खर्च अपेक्षित आहे. शिरुर-अहमदनगर बाह्यवळण रस्त्यामार्गे छत्रपती संभाजीनगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासाठी २ हजार ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

टोलवसुली संपल्यानंतर एमएसआयडीसीकडे हस्तांतरणशिरुर ते अहमदनगर या मार्गामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे. त्यामुळे ही पथकर वसुली संपल्यानंतर हा मार्ग एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल. अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) ते देवगड रस्ता सुधारण्यासाठी तो एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल. तसेच देवगड ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे. ती संपुष्टात आल्यानंतर हा मार्ग एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल.

सध्या रोडची अवस्था कशीविद्यमान चौपदरी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.विद्यमान रोडवर किती वाहने: छत्रपती संभाजीनगर ते पुणे या मार्गावर सध्या २० हजार वाहनांचा राबता आहे.रोडचे रुंदीकरण केव्हा: या रोडचे रुंदीकरण २४ वर्षांपूर्वी झाले.टोलवसुली कधीपर्यंत: अंदाजे पाच वर्षांपर्यंत टोलवसुली असेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPuneपुणेhighwayमहामार्ग