शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार घेऊन गेली अन् घात झाला! ५७ वर्षांच्या PSI कडून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:45 IST

पोलिस उपनिरीक्षकाचे मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत कृत्य, कुटुंबाकडूनही मारहाण; ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : मोबाइल हरवल्याची तक्रार घेऊन आलेल्या २३ वर्षीय मुलीसोबत ५७ वर्षांचा क्रांती चौक ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुभाष चव्हाणने मैत्री केली. यानंतर विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहताच तीन वेळा गर्भपातही करण्यात आला. यात कुटुंबाने तरुणीलाच मारहाण केल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. त्यावरून चव्हाणवर गुरुवारी बलात्कार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित २३ वर्षीय तरुणी ७ मार्च, २०२५ रोजी क्रांती चौक ठाण्यात मोबाइल हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेली होती. तेव्हा ठाण्यात हजर चव्हाणने तिचा अतिरिक्त मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर तपासाचे कारण करून चव्हाण तिला सतत संपर्क करू लागला. १७ मार्चला मोबाइल सापडल्याचे सांगून चव्हाणने संबंधित तरुणीला हॉटेलमध्ये बोलावले. त्यानंतर विश्वासात घेतले. मी तुझी जबाबदारी घेतो, लग्न करतो, असे आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. रेल्वेस्थानक परिसर, अहिल्यानगरात तिला सातत्याने भेटत राहिला. जून २०२५ मध्ये तरुणी गर्भवती राहिल्याचे कळाल्यानंतर चव्हाणने तातडीने तिला पुण्यात नेत गर्भपात घडवून आणला.

जुलै २०२५ मध्ये मात्र चव्हाणने तरुणीला धमकावणे, जातिवाचक शिवीगाळ करण्याचे प्रकार सुरू केले. तिला शहरात बोलावून घाबरवून, धमकावून बलात्कार करून मारहाण करू लागला. तरुणीने याबाबत त्याच्या कुटुंबाला हा प्रकार सांगण्याची धमकी दिल्यावर त्याने तिच्यावरच उलट खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

पत्नी, मुलाकडून तरुणीला मारहाणचव्हाणच्या घरापर्यंत त्याच्या या कृत्याबाबत माहिती पोहोचली. तरुणीच्या तक्रारीतील आरोपानुसार, ती दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर चव्हाणची पत्नी नर्मदा, मुलगा सागरने गर्भपात करण्यासाठी तिला मारहाण केली. १८ जानेवारीला तरुणी न्यायालयात गेली. तेव्हा चव्हाणने तिला तेथेही धमकावले. त्यामुळे संतप्त तरुणीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यावरून चव्हाणसह त्याची पत्नी, मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Complaint turns deadly: PSI rapes 23-year-old, forces abortions.

Web Summary : A 57-year-old PSI befriended a 23-year-old filing a complaint, then repeatedly raped her. He forced abortions after she became pregnant, with his family assaulting her. Police have registered a case against the officer and his family.
टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी