शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरचा 'महापौर' ठरला! भाजपचा समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:05 IST

भाजपच्या समीर राजूरकर यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या विकासाची धुरा.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. शहराचे महापौरपद 'खुले' (सर्वसाधारण) जाहीर झाल्याने अनेक नावे पुढे आली होती. मात्र, भाजपने प्रदीर्घ चर्चा करून आपला पत्ता उघड केला आहे. समर्थनगर प्रभागाचे अभ्यासू नगरसेवक समीर राजूरकर यांची शहराच्या 'प्रथम नागरिक' पदाचे उमेदवार म्हणून भाजपने निवड केली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने आता निवडीची औपचारिकात बाकी आहे. 

वेगवान राजकीय घडामोडी आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांमध्ये महापौर पदासाठी चुरस वाढली होती. दरम्यान,  स्थानिक कोअर कमिटीच्या अनेक बैठकांमधून प्रामुख्याने चार नावांची चर्चा होती. मात्र, एकवाक्यता होत नसल्याने निर्णय मुंबईतील वरिष्ठ नेतृत्वावर सोपविण्यात आला. त्यानंतर आज भाजपच्या गोटातून एक नाव समोर आले.  दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले समीर राजूरकर यांच्या नावावर एकमत झाले. शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी या निवडीला दुजोरा दिला आहे. गुरुवारी सकाळीच गोविंद केंद्रे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. राजुरकर आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

सत्तेचे गणित ११५ सदस्यीय महानगरपालिकेत भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी ५८ मतांची आवश्यकता असताना, भाजप आता सर्वात मोठा पक्ष म्हणून शहराचा कारभार हाती घेणार आहे. राजूरकर यांच्या निवडीमुळे भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आता औपचारिक निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील यापूर्वीचे महापौरगजानन बारवाल (१८-४-१९९६ ते ७-५-१९९७),सुदाम सोनवणे (२०-४-१९९९- ते २९-४-२०००),किशनचंद तनवाणी (२९-४-२००५ ते ४-११-२००६),विजया रहाटकर (२९-१०-२००७ ते २८-४-२०१०),त्र्यंबक तुपे (२९-४-२०१५ ते ३०-११-२०१६)भगवान घडमोडे (१४-१२-२०१६ ते २८-१०-२०१७).

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's Sameer Rajurkar elected as Mayor of Chhatrapati Sambhajinagar!

Web Summary : Sameer Rajurkar of BJP is elected as the Mayor of Chhatrapati Sambhajinagar. After much discussion, BJP chose the experienced corporator for the position. With BJP holding majority, the election is now a mere formality.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपा