छत्रपती संभाजीनगर : हिंदू नववर्षाचा उत्साह आणि गुढीपाडव्याचा सोन्यासारखा मुहूर्त... या पूर्ण मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेने विक्रमी भरारी’ घेतली आहे. घर असो वा गाडी, किंवा सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू-प्रत्येक शोरूमवर खरेदीसाठी झुंबड होती. शहरवासीयांनी कोट्यवधींची उलाढाल करून नववर्षाचा आनंदोत्सव साजरा केला.
गुढीपाडवा अन् रमजानची खरेदी ६०० कोटींची उलाढाल !रमजान ईद अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्याने एकीकडे ‘अप टू डेट’ खरेदीसाठी मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने गुरुवारी बाजारपेठेत ‘खरेदी उत्सव’ साजरा करीत होते. तर दुसरीकडे गुढीपाडवा सणानिमित्त हिंदू बांधवही खरेदीला घराबाहेर पडले होते. शहरात दिवसभरात सुमारे ६०० कोटींची उलाढाला झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी यांनी दिली.
ऐन मुहूर्तावर सोने-चांदीचे भाव घसरलेसाडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण व पहिला मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. आज ज्वेलर्सच्या शोरूममध्ये सोने व दागिने खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सोने ६ हजार रुपयांनी कमी होऊन १ लाख ५० हजार रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदी १० हजाराने स्वस्त होऊन २ लाख ३५ हजार रुपये प्रति किलोने विक्री झाली. यामुळे सोने खरेदीचा आनंद वाढला होता. दिवसभर खरेदी मंद होती पण, सायंकाळी शोरूममध्ये गर्दी झाली, अशी माहिती गिरधरभाई जालनावाला यांनी दिली.
३ हजार नवीन वाहने रस्त्यावरजीएसटी कमी झाल्याने दुचाकीमागे १० ते १५ हजार रुपये किमती दिवाळीपासूनच कमी झाल्या आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याला शहरात २ हजार नवीन दुचाकी खरेदी झाली. ७५ हजार ते सव्वालाख दरम्यानच्या दुचाकी जास्त विक्री झाल्या. यात पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीचे प्रमाण जास्त होते.
४०० इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीदरवर्षी इलेक्ट्रिक दुचाकी विक्री १० ते १२ टक्क्याने वाढत आहे. गुढीपाडव्यानिमित्त ३०० ते ४०० इलेक्ट्रिक दुचाकी विक्री झाल्या.- राहुल मिश्रीकोटकर, अध्यक्ष,फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन
हजार कारची विक्रीबाजारात कारला मागणी प्रचंड असली तरी, सेमी-कंडक्टर आणि इतर स्पेअर पार्ट्सच्या तुटवड्यामुळे कार उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे खरेदीदारांना नवीन कारसाठी महिना ते दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. काही मॉडेल्ससाठी हे वेटिंग ३ महिन्यांपर्यंत देखील जात आहे. महिनाभरापूर्वी ज्यांनी बुकिंग केली त्यांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कारच्या चाव्या आज देण्यात आल्या. आज १ हजार कारची विक्री झाली आहे. इंधनाचे वाढते दर आणि भविष्यातील तंत्रज्ञान म्हणून ग्राहक ई-कारकडे वळू लागले आहेत. ५० पेक्षा जास्त ई-कार विक्री झाल्याची माहिती वितरक सचिन मुळे यांनी दिली.
घरांच्या नोंदणीचा धडाका ! २५० घरांची बुकिंगगुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहराच्या रिअल इस्टेट क्षेत्रात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. सर्व बांधकाम व्यावसायिकांचे मिळून दिवसभरात २५० ते ३०० घरांची बुकिंग झाली. यात ७० टक्के बुकिंग ही ‘अफोर्डेबल’ घरांच्या श्रेणीत झाली आहे. यामुळे प्रामुख्याने ४० ते ७० लाख रुपयांच्या घरांना (२ बीएचके) सर्वाधिक मागणी दिसून आली. ८० लाख ते दीड कोटी दरम्यानच्या ३ बीएचके फ्लॅटसाठी ३० टक्के बुकिंग झाली. तसेच दोन ते अडीच कोटी दरम्यानचे पेंट हाऊस व रो-बंगलोचीही बुकिंग झाल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष संग्राम पटारे यांनी दिली.
Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's market witnessed record sales on Gudi Padwa. Driven by festival and Ramadan shopping, the city saw ₹600 crore turnover. Gold prices dropped, boosting sales alongside vehicles and homes, marking a prosperous start to the new year.
Web Summary : गुड़ी पड़वा पर छत्रपति संभाजीनगर के बाजार में रिकॉर्ड बिक्री हुई। त्योहार और रमजान की खरीदारी से शहर में ₹600 करोड़ का कारोबार हुआ। सोने की कीमतें गिरने से वाहनों और घरों की बिक्री बढ़ी, जिससे नए साल की शुरुआत अच्छी हुई।