शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात छावासह मराठा संघटनांचे आंदोलन; क्रांतीचौक परिसर दणाणला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 19:05 IST

सूरज चव्हाणच्या प्रतिमेला आसूडाचे फटके आणि जोडे

बापू सोळुंके, छत्रपती संभाजीनगर: अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना लातुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी  केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद साेमवारी शहरात उमटले. छावासह विविध मराठा संघटनांनी क्रांतीचाैकात राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत  निदर्शने केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रतिमेला आसूडाचे फटके मारत पत्त्यांची उधळण केली.

लातूर येथे छावाचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ छावासह विविध मराठा संघटना आणि शेतकरी संघटनांनी सोमवारी सकाळी क्रांतीचौकात जोरदार आंदोलन केले.  सूरज चव्हाणला अटक करा, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेचे करायचे काय, खाली मुंडकं वर पाय, अजीत दादा हाय, हाय, सुनील तटकरे हाय, हाय, सूरज चव्हाण मूर्दाबाद, अशा घोषणा देत आंदोलकांनी सोमवारी क्रांतीचौक दणाणून सोडला.यावेळी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेला आसूडाचे फटके मारले. तर काहींनी जोडे मारले.

अनेकांनी सोबत आणलेल्या पत्त्याचा कॅट उधळत जोरदार घोषणा दिल्या. तर अचानक काही आंदोलकांनी रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलिसांनी त्यांना उचलून बाजूला नेल्याने वाहतूक सुरळीत झाली. या आंदोलनातप्रा. चंद्रकांत भराट, प्रा. माणिकराव शिंदे, आप्पासाहेब कुढेकर,सुरेश वाकडे पाटील, सुनील कोटकर, आत्माराम शिंदे, संतोष काळे, विजय काकडे, अशोक मोरे, पंढरीनाथ गोडसे, भरत कदम, नितीन कदम, रमेश गायकवाड, राजीव थिटे, लक्ष्मण नवले,नीलेश डव्हळे, ज्ञानेश्वर गायकवाड, कल्याण शिंदे, शैलेश भिसे,रेखा वाहटुळे, दिपाली बोरसे, दिव्या पवार , बळीराजा शेतकरी संघटनेचे निवृत्ती डक आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

बॅनर फाडले...

उस्मानपुरा रस्त्यावरील एका इमारतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्याचे बॅनर लावण्यात होते. हे बॅनर कार्यकर्त्यांनी फाडून राष्ट्र्रवादीच्या नेत्यांचा निषेध नोंदविला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmarathaमराठाNCPराष्ट्रवादी काँग्रेस