शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

छत्रपती संभाजीनगरची जागा 'वंचित'चीच; बाळासाहेब आंबेडकरांच्या घोषणेनेने आघाडीत खळबळ

By स. सो. खंडाळकर | Updated: March 15, 2024 11:28 IST

महाविकास आघाडीतील १५ जागांवरचे भांडण मिटण्याची वाट पाहतोय. नाही तर माझा ४८ जागांचा पर्याय खुला आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभेची जागा ही वंचित बहुजन आघाडीची असून ती आम्ही जिंकलेली असल्याने आम्ही सोडणार नसल्याचे जाहीर करून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. गुरुवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त घोषणा केली परंतु उमेदवाराचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवले.

ॲड. आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतील १५ जागांवरचे भांडण मिटण्याची वाट पाहतोय. नाही तर माझा ४८ जागांचा पर्याय खुला आहे. यावेळी आपण अकोल्यातून एकाच ठिकाणाहून लढणार आहोत. अमरावतीहून सुजात आंबेडकर यांनी लढावे असा जनतेचा आग्रह आहे, असे ते म्हणाले. संजय राऊत हे नेमके कुणाचे प्रवक्ते आहेत? उबाठाचे, शरद पवारांचे की काँग्रेसचे असा सवाल उपस्थित करीत त्यांच्याबद्दलचा राग व्यक्त केला.

यावेळी डॉ. धैर्यवान पुंडकर,सिद्धार्थ मोकळे, प्रभाकर बकले, योगेश बन, ॲड. लता बामणे, महेश निनाळे, पंडितराव तुपे, रवी तायडे, सय्यद जफर आदींची उपस्थिती होती.

मनोज जरांगेंना बदनाम करण्याचा,संपवण्याचा प्रयत्न होईलमनोज जरांगेंना संपवण्याचा प्रयत्न होईल. त्यांना बदनाम केले जाईल. नजीकच्या काळात मॉर्फिंग करून त्यांना अश्लील स्वरूपात दाखवण्यात येईल, त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये, असे खळबळजनक आवाहन ॲड. आंबेडकरांनी केले. ते म्हणाले, मनोज जरांगे यांचे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाला काबूत घेता आले नाही. नाना तऱ्हेने ते दाबण्याचा प्रयत्न होत आहे. माझी अधिकृत माहिती आहे की, जरांगे पाटील यांचा व्हिडीओ तयार करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यांच्या समर्थकांना विचलित करण्याचा यातून प्रयत्न होणार आहे. हे अत्यंत घाणेरडे राजकारण खेळले जाणार आहे. मी हा व्हिडीओ पाहिला नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्वत: जरांगे पाटील यांनीही याबद्दलची दक्षता घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. आंबेडकर पुढे म्हणाले, अशा बदनामीपासून वाचण्यासाठी आता जरांगेंनी राजकीय प्रवास सुरू केला पाहिजे. जे आरक्षण मिळाले आहे, ते टिकवण्याची पहिली जबाबदारी त्यांची आहे. त्यांच्याच समाजातून विरोध करणाऱ्यांनाही हेच उत्तर राहील. जरांगेंमुळे प्रस्थापित मराठ्यांना धक्का बसू शकतो. अधिक उमेदवार करण्यामुळे ईव्हीएम बाद होऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी