शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरची 'स्वच्छता परीक्षा': केंद्रीय पथक येणार, 'टॉप टेन'साठी मनपाची तयारी

By मुजीब देवणीकर | Updated: March 17, 2026 15:38 IST

मार्चअखेर केंद्रीय पथकाची शहरात पाहणी; पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेवर मिळणार विशेष गुण

छत्रपती संभाजीनगर : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत दरवर्षी शहर स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक येते. यंदा हे पथक मार्चअखेरीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची जोरदार तयारी सुरू असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा शहराच्या क्रमवारीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षीही १२ हजार ५०० गुणांसाठी ही स्पर्धा होत आहे.

केंद्र शासनाने गत काही वर्षांपासून स्वच्छ भारत अभियान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचे सर्वेक्षण होते. यंदाही मार्चअखेरीस केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीचे पथक शहरात पाहणीसाठी दाखल होईल. वॉटर प्लस, गारबेज फ्री सिटी या दोन उपक्रमांसाठी प्रत्येक १ हजार गुण दिल्या जातील. ऑन गोईंग असेसमेंट सिटीझन फिडबॅकमध्ये १ हजार ५०० गुण आहेत. शहरात कचऱ्याचे संकलन, प्रक्रिया, कचऱ्याचे उगमस्थान, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, व्यावसायिक व बाजारपेठेत कचऱ्यासाठी दोन स्वतंत्र बीन लावलेले असतात का? पब्लिक प्लेस, व्यावसायिक ठिकाणांवर मनपाचे सार्वजनिक शौचालये किती आणि कसे आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला स्ट्रॉम वॉटरची व्यवस्था? असेल तर ते सुस्थितीत आहे का? शहरात सौंदर्यीकरणासाठी कोणकोणते उपाय केले आहेत. रस्त्यांवर पेंटिंग केली आहे का? हेही बघितले जाईल.

पर्यटनस्थळांकडे यंदा लक्षदरवर्षी केंद्रीय पथक पर्यटन विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नव्हते. यंदा पर्यटनाला विशेष असे महत्त्व दिले आहे. त्यानुसार केंद्रीय पथक पर्यटनस्थळांचीही पाहणी करेल. या ठिकाणी पर्यटकांना मूलभूत सोयीसुविधा आहेत का? याची पाहणी केली जाईल. त्यानुसार महापालिकेला गुण दिले जातील.

दरवर्षी निकषांमध्ये बदलगतवर्षी शहराची क्रमवारी ज्या कारणांमुळे घसरली त्यावर मनपा भर देते. दुसऱ्या वर्षी केंद्र शासनाचे निकष बदलतात. जे काम केले त्याला गुण मिळत नाहीत. जे राहून गेले त्याचे गुण कापले जातात.

कचऱ्यासाठी नवीन एजन्सीकचरा संकलनासाठी गुजरात येथील वेस्टर्न इमॅजनरी या कंपनीची नेमणूक केली. ही कंपनी १ एप्रिलपासून काम सुरू करणार आहे. यामुळे पुढील वर्षी शहराच्या क्रमवारीत बरीच सुधारणा होईल. शहर शंभर टक्के टॉप टेनमध्ये येणारच.- नंदकिशोर भोंबे, उपायुक्त, मनपा

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Prepares for Cleanliness Exam, Aims for Top Ten

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar gears up for the Swachh Bharat Mission assessment. The city focuses on waste management, public facilities, and beautification, especially around tourist spots, to improve its ranking and achieve a top-ten position.
टॅग्स :Municipal Corporationनगर पालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान