शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

७५ पैकी २५ कोटींच्या कामांची निविदा संचिका गहाळ? जिल्हा प्रशासन, महापालिका, बांधकाम विभागाचा डबल गेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 13:22 IST

सप्टेंबरपासून पत्रव्यवहार, तरीही चौकशी ठप्प! ७५ कोटींच्या विकासकामात यंत्रणेची मिलीभगत?

- विकास राऊत

छत्रपती संभाजीनगर : नगरविकास खात्याने शहरात महापालिका हद्दीत मंजूर केलेल्या ७५ कोटींतून झालेल्या कामांमध्ये डबल गेम झाल्याचा संशय आहे. त्यातच ‘या कामातील २५ कोटींच्या निविदेतील प्रशासकीय मान्यतेची संचिका सापडत नाही’, असे जिल्हा प्रशासन व बांधकाम विभाग सांगत असल्याने संचिका गहाळ झाल्याचे पुढे येत आहे. हा सगळा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यातून दिसते आहे. बी २/०२ २०२४-२५ या वर्कऑर्डरनुसार दिलेल्या १३० कामांच्या प्रशासकीय मान्यतेच्या संचिका उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे.

या प्रकरणाचा गोलमाल करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदारांनी या कामांची संचिका गहाळ केल्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही चौकशीचा निर्णय होत नसल्यामुळे संशयकल्लोळ वाढत चालला आहे. राज्य शासन सध्या कर्जबाजारी होऊन विकासकामांचा गाडा हाकत आहे, तर दुसरीकडे शासनाकडून आलेल्या निधीचा गैरवापर करून यंत्रणा आपली घरे भरत असल्याचा प्रकार उघडकीस येऊनदेखील त्यात दोषी कोण आहे, याची माहिती समोर आणण्यात बांधकाम विभाग पाऊल मागेमागे घेत असल्याचे दिसते आहे.

नगरपालिका प्रशासनाकडून सप्टेंबर २०२५ मध्ये बांधकाम विभागाला कामांच्या गैरप्रकाराबाबत तातडीने चौकशी करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले होते. चौकशी सुरू झाली नसल्याने याबाबत पुन्हा स्मरणपत्र दिले, मात्र अद्याप कोणतीही ॲक्शन बांधकाम विभागाने घेतलेली नाही. तत्कालीन सहआयुक्त असलेले सय्यद रफीक यांनी संबंधित विकासकामांच्या चौकशीसाठी पत्रव्यवहार केला होता.

क्युआर कोड निविदा प्रकरणात चौकशीक्यूआर कोड, निविदा घोटाळ्याप्रकरणी २० फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार पाचजणांची चौकशी समिती गठित केली. एक महिन्यात ही समिती चौकशी अहवाल देईल, असा दावा आहे. मग ७५ कोटींच्या कामांप्रकरणी चौकशी समितीला विलंब का? असा प्रश्न आहे. या प्रकरणातही बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन व महापालिकेच्या यंत्रणेतील बडे मासे अडकल्याची शक्यता आहे.

एकाच अभियंत्याकडे कामांचा ढीगबांधकाम विभागातील एकाच कनिष्ठ अभियंत्यांकडे सगळ्या कामांचा ढीग लागलेला आहे. महापालिका हद्दीत कोणत्या कामाची गरज कुठे आहे. ते काम खरच महत्त्वाचे आहे का? याचा कुठलाही सारासार विचार न करता प्रशासकीय मान्यता, एनओसी मिळाली की, बांधकाम विभागांनी या सगळ्या कामांचा बार उडविला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 25 Crore Tender Files Missing: Double Game by Authorities Suspected

Web Summary : A suspected double game in sanctioned works worth ₹75 crore surfaces as ₹25 crore tender files go missing. Authorities delay inquiry into alleged misuse of funds despite formal complaints, raising suspicion of a cover-up involving officials and contractors. A QR code tender scam probe is underway, further highlighting potential corruption.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजी