शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात ३,००० घरांना पाइपलाइन गॅस सुरू; सिलिंडर बुकिंगची कटकट संपली!

By विकास राऊत | Updated: March 27, 2026 19:32 IST

उद्योगांनंतर आता हॉटेल्सनाही मिळणार पाइपलाइन गॅस; शहरातील गॅस टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा

छत्रपती संभाजीनगर : अमेरिका - इस्त्रायल, आखाती देशातील युद्धामुळे सध्या शहरात व्यावसायिक आणि वाहनांसाठीच्या एलपीजी गॅसचा मोठा प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोलपंपांवर २ ते ३ किमीच्या रांगा लागत आहेत. अशा परिस्थितीत काही प्रमाणात का होईना, पाइपलाइन गॅसमुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळत आहे.

शहरात पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस (पीएनजी) पुरवठा सुरू केला असून, टप्प्याटप्प्याने शहरातील १ लाख घरांना संबंधित गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या तीन हजार घरांना पाइपद्वारे याचा लाभ मिळत आहे. गारखेडा, गजानन महाराज मंदिर, ज्योतीनगर, बन्सीलालनगर आणि बीड बायपास यासारख्या भागात गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. यापैकी बीड बायपास आणि वाळूज महानगर १ या भागात पाइपलाइन टाकून गॅस पुरवठा केला जात आहे. पुढील टप्प्यात शहरातील मनपाचे झोन क्र. ७, ८ आणि ९ मध्ये पाइपलाइनचे नेटवर्क उभारण्यात येणार आहे.श्रीगोंदा ते वाळूज ते शेंद्रा असे पाइपलाइनचे नेटवर्क आहे. २५० किमीपर्यंतचे गॅस पाइपलाइन टाकण्याचे नेटवर्क १ लाख घरांना गॅस पुरविल, असा दावा बीपीसीएल करीत आहे. मार्च २०२२ पासून या योजनेचे काम सुरू झाले आहे.

पाइपलाइन गॅस सुविधेची ठळक वैशिष्ट्ये :प्रकल्प : हा प्रकल्प केंद्र सरकारच्या शहर गॅस वितरण योजनेचा भाग आहे.व्याप्ती : सुरुवातीच्या टप्प्यात शहराच्या मुख्य भागात आणि नंतर विस्तारित भागात काम पूर्ण करण्यात येणार आहे.मीटर कोणत्या भागात : गारखेडा परिसर, गजानन महाराज मंदिर, ज्योतीनगर, बन्सीलालनगर, प्रतापनगर आणि बीड बायपास या भागातील सुमारे १ लाख घरांमध्ये गॅस कनेक्शनचे काम पूर्ण झाले आहे.फायदे : सिलिंडर बुकिंगची गरज नाही, २४ बाय ७ अखंड पुरवठा आणि सुरक्षितताप्रकल्पाची किंमत : ४ हजार ५०० कोटीप्रकल्प कंत्राटदार : बीपीसीएल

गॅस पंपांना देखील पुरवठा सुरूरोज ६० घरांमध्ये कनेक्शन देण्यात येत आहे. मनपाचे झोन ५, ७, ८ व ९ मध्ये पाइपलाइनचे काम सध्या सुरू आहे. वाळूज महानगर, बीड बायपास, विमानतळ परिसर, पुढील दोन महिन्यांत पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण होईल. शहरातील सर्व रेल्वे क्रॉसिंग लगत पाइपलाइन टाकण्याचे काम बाकी आहे. पुढील एक महिन्यात ते पूर्ण होईल. गॅस पंपांना देखील पुरवठा सुरू आहे. साधारणतः ३ हजार घरांचे सिलिंडर बंद झाले आहेत.- मनोज जाधव, बीपीसीएल प्रतिनिधी

English
हिंदी सारांश
Web Title : Pipeline Gas Starts for 3,000 Homes in Sambhajinagar, Ending Cylinder Woes

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar residents get relief as pipeline gas connects 3,000 homes. BPCL aims to reach 1 lakh homes, ending cylinder dependence. Despite LPG shortages, areas like Garkheda now have uninterrupted gas supply, a ₹4,500 crore project benefiting residents.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर