शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरातून थेट परदेशवारीला ‘इमिग्रेशन’चे ‘चेकमेट’; परदेशी पाहुणे नाराज

By संतोष हिरेमठ | Updated: March 18, 2026 20:01 IST

परदेशी पाहुणे नाराज, शासन कधी घेणार मनावर? १३ विमानतळांत समावेश असूनही संभाजीनगरची विमानसेवा 'ग्राउंडेड'

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरसारख्या जागतिक वारसास्थळांनी नटलेल्या शहरातून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हावी, ही अपेक्षा गेली दोन वर्षे केवळ आश्वासनांपुरतीच मर्यादित राहिली आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर सर्व सुविधा तयार, एअरलाइन्सची तयारी पूर्ण; तरीही केवळ इमिग्रेशन चेकपोस्टच्या मंजुरीअभावी शहराची परदेशवारी ‘रनवे’वरच थांबली आहे.

पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरुळ आणि अजिंठा यांसारखी जागतिक वारसास्थळे आहेत. या दोन स्थळांशिवाय इतरही ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत. रोज हजारो पर्यटक या शहरात येतात. तरीही या शहरात आंतरराष्ट्रीय विमानसेवा का नाही, असा सवाल गत आठवड्यात ‘फॅमल रायझिंग टूर’साठी जर्मनीहून आलेल्या पाहुण्यांनी उपस्थित केला. दोन वर्षांपूर्वी एअर एशिया एअरलाइन्सने बँकाॅक विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. ब्यूरो ऑफ इमिग्रेशनच्या (बीओआय) अधिकाऱ्यांनी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानप्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. मात्र, गृहमंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्टला (आयसीपी) मंजुरी मिळण्याची प्रतीक्षाच आहे. ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरू होते, याकडे विमान प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

प्रोत्साहन योजना नावालाचगतवर्षी जूनमध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) देशभरातील १३ निवडक विमानतळांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजना सुरू केली. या १३ विमानतळांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे; परंतु शहरातून विमानाने परदेशवारी करण्याची प्रतीक्षाच आहे. उन्हाळा, पावसाळा तसाच जाईल; परंतु किमान पर्यटन हंगामापासून म्हणजे हिवाळ्यापासून शहरातून परदेशवारी घडण्यास सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पाठपुरावा सुरूविमानतळावर इमिग्रेशन चेक पोस्ट लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. इमिग्रेशनची सुविधा सुरू झाल्यानंतरच आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी आमच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)

सर्व मानक सुविधा उपलब्धइमिग्रेशन चेक पोस्टसाठी आवश्यक असलेल्या सर्व मानक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, ‘बीओआय’कडून तपासणीही करण्यात आली असून, काही बदल आवश्यक असल्यास त्याबाबतचा अहवाल प्रतीक्षेत आहे.- शरद येवले, संचालक, छत्रपती संभाजीनगर विमानतळ

English
हिंदी सारांश
Web Title : Immigration Checkmate Halts Chhatrapati Sambhajinagar's International Flights; Tourists Disappointed

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar airport awaits immigration approval despite complete facilities. International flight plans, including Air Asia's Bangkok service, are stalled, frustrating tourists visiting world heritage sites like Ajanta and Ellora. Promotional schemes remain ineffective. Officials are pursuing the matter, hoping for a winter season launch.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरairplaneविमान