शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

छत्रपती संभाजीनगराला मिळणार १०० इलेक्ट्रिक बस, केंद्र शासनाकडून मिळाली मंजुरी

By मुजीब देवणीकर | Updated: July 4, 2024 16:46 IST

पीएम ई-बससेवा योजनेसाठी महापालिकेकडून लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : पीएम ई-बस योजनेंतर्गत केंद्र शासनाने यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर शहराचा समावेश केला. शहरासाठी १०० ई-बस डिसेंबर अखेरपर्यंत प्राप्त होणार आहेत. जानेवारी २०२५ मध्ये नवीन ई-बस शहरात धावतील. यासाठी लागणारा अत्याधुनिक डेपो स्मार्ट सिटी प्रशासनाने जाधववाडी येथे ११ एकर जागेवर उभारला. त्यामुळे बस लवकर प्राप्त होणार आहेत.

केंद्र शासनाने ऑगस्ट २०२३ मध्ये पीएम ई-बस सेवा योजनेची घोषणा केली. त्यासाठी दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने स्मार्ट सिटी मार्फत प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत व्हावी, प्रदूषण रोखण्यासाठी या बसेस उपयुक्त ठरत आहेत. केंद्राने शहरासाठी शंभर इलेक्ट्रिक बस देण्यास हिरवी झेंडी दाखविली. बससाठी लागणारा मोठा डेपो अगोदरच स्मार्ट सिटीने तयार करून ठेवला आहे. आणखी डेपो वाळूज एमआयडीसीने आरक्षित केलेल्या जागेवर स्मार्ट सिटीमार्फत बांधण्याचे नियोजन आहे. एमआयडीसीसोबत लवकरच जागेसाठी सामंजस्य करार केला जाणार आहे. बसडेपो उभारण्यासाठी दीडशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक केंद्र सरकारकडे सादर केले आहे.

सर्व प्रक्रिया लवकरात लवकरपीएम ई-बससेवा योजनेसाठी महापालिकेकडून लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहे. केंद्र सरकारने देखील बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. शंभर ई-बसेस नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

डिझेलवर १०० बस सुरूस्मार्ट सिटीमार्फत सध्या १०० डिझेल बसेस २०१८ पासून चालविण्यात येत आहेत. या सेवेला नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. स्मार्ट सिटीच्या ताफ्यात आणखी १०० ई-बस दाखल झाल्यावर शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर