शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

‘हारमन’मध्ये केमिकल स्फोट

By admin | Updated: December 1, 2014 01:28 IST

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील हारमन कंपनीत रविवारी रात्री अचानक दोन स्फोट झाले.

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील हारमन कंपनीत रविवारी रात्री अचानक दोन स्फोट झाले. या स्फोटांनंतर कंपनीच्या गोडाऊनमधील केमिकलचे शेकडो बॅरल जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही भाजले नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. औषधी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तयार करणाऱ्या हारमन कंपनीत रविवारी रात्री ६.४५ वाजेच्या सुमारास एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. स्फोटांच्या आवाजासोबतच कंपनीतून शंभर फूट उंचीचे आगीचे लोळ उठले. या घटनेची माहिती तातडीने अग्निशामक दल आणि एमआयडीसी सिडको पोलिसांना देण्यात आली.पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कंपनीकडे जाणारा रस्ता सर्वसामान्यांसाठी पोलिसांनी बंद केला. कंपनी मार्गावर केवळ अग्निशामक दलाच्या गाड्यांनाच प्रवेश देण्यात येत होता. मनपा अग्निशामक दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचे चार टँकर आणि एमआयडीसी शेंद्रा येथील अग्निशामक दलाचा एक बंबही मदतीसाठी घटनास्थळी आला होता. सर्वांनी मिळून सुमारे एक तास अथक प्रयत्न केल्यानंतर आग नियंत्रणात आली.केमिकलचे शेकडो ड्रम जळून खाकआग विझविण्याचे काम सुरू असताना तेथील केमिकलच्या ड्रमचे स्फोट होत असत. आग ज्या ठिकाणी लागली होती ते कंपनीचे गोडाऊन असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे केमिकलचे शंभराहून अधिक ड्रम तेथे होते. याप्रसंगी कंपनीचे कामगारही आग विझविण्याकरिता अग्निशामक दलाच्या जवानांना मदत करीत होते. अमोनिया गळतीमुळे स्फोटअमोनियाच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला. आग लागली तेव्हा दुसऱ्या पाळीचे सुमारे ८० कामगार ड्यूटीला होते. स्फोटानंतर आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने त्या ठिकाणी एकही कामगार नव्हता. त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही.