शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

छबिना मिरवणूक, सीमोल्लंघन उत्साहात

By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या विविध भागात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवारी दसऱ्यानिमित्त ठिकठिकाणी वाजत-गाजत छबिना मिरवणूक काढून

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या विविध भागात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवारी दसऱ्यानिमित्त ठिकठिकाणी वाजत-गाजत छबिना मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात सिमोल्लंघन खेळण्यात आले. यानिमित्त आपट्याची पाने सोने म्हणून लुटून एकमेकांना विजया दशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. भवानी देवी मातेची छबिना मिरवणूकउमरगा : शहरातील कुंभारवाडा येथील भवानी देवी मातेची छबिना मिरवणूक शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी भाविकांचय ‘आई राजा उदो ऽऽ उदोऽऽऽ’ च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. कुंभारवाडा येथील श्री तुळजाभवानी मंदिरात मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष शकुंतलाताई मोरे, लक्ष्मणराव मोरे यांच्या हस्ते देवीची आरती होऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. देवी मंदिर, जुनी पेठ, भीमनगर, राष्ट्रीय महामार्ग, शिवाजी चौक, महादेव मंदिरापासून परत ही मिरवणूक देवी मंदिरात आणण्यात आली. गळ्यात कवड्यांची माळ, हातात पोत घेऊन ‘आई राजा उदो उदो’ चा जयघोष करीत आराधी व भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास अजाबळी व अग्निप्रवेशाचा कार्यक्रम येथे पार पडला. दरम्यान, शहरातील कोळीवाडा येथील देवी मंदिराच्या छबिना मिरवणुकीतही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहाटे पुजारी ईश्वर कावाले यांच्या हस्ते अजाबळीचा विधी पार पडला. तसेच उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे जयभवनी मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाची सांगता शुक्रवारी भवानी मातेच्या छबिना मिरवणुकीने झाली.यंदा नवमी व दशमी एकाच दिवशी आल्याने भवानी मातेची छबिना मिरवणूक दसऱ्या दिवशी (शुक्रवारी) रात्री दहा वाजता गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या ट्रॅक्टरमधून कुंकवाची उधळण करीत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचा समारोप शनिवारी सकाळी सहा वाजता हनुमान चौकातील भवानी माता मंदिराजवळ झाला. मिरवणुकीत ढोल, हालगी, ताशे, संबळ, पताका, पोतधारी महिला व पुरूष भाविक मोठ्या सख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी उपसरपंच संजय वार, मनोज काजळे, मंडळाचे अध्यक्ष मारूती थोरे, उपाध्यक्ष विठ्ठल कराळे, कोषाध्यक्ष दिलीप भुसारे, तुकाराम लवटे, कुमार पवार, संजय जाधव, कमलाकर पांढरे, व्यंकट रामतिर्थे, उमाकांत तपसाळे, राजें’्र जाधव, राजू थोरे, महेश कराळे, कमलाकर शिंदे, संजय गुरव, किशोर साठे, चैतन्य जाधव, बबलू शिंदे, उमाकांत बाळेकर आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)