मतदान यंत्रांची तपासणी आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:17 IST2018-09-12T01:16:24+5:302018-09-12T01:17:24+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील ०९ विधानसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट (मतदान यंत्र), कंट्रोल युनिट (नियंत्रण यंत्र), इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (बेल) बंगळुरू येथील २१ अभियंते करणार आहेत. ५ हजार ७४३ बीयू व ३ हजार ७३९ सीयूंचा कोटा जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे.

मतदान यंत्रांची तपासणी आजपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील ०९ विधानसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट (मतदान यंत्र), कंट्रोल युनिट (नियंत्रण यंत्र), इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (बेल) बंगळुरू येथील २१ अभियंते करणार आहेत. ५ हजार ७४३ बीयू व ३ हजार ७३९ सीयूंचा कोटा जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे. व्हीव्हीपॅट यंत्र आलेले नाहीत.
शासकीय कला महाविद्यालयात १२ सप्टेंबरपासून यंत्रांची तपासणी होणार आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना या तपासणी सत्रात सहभागी होण्यासाठी त्यांचे अधिकृत प्रतिनिधी पाठविता येतील. ईव्हीएम मशीनच्या योग्यतेबद्दल तसेच मॉकपोलबद्दल त्यांना खात्री करता येईल. ईव्हीएम मशिन्स व पिंक पेपरसीलचे अनुक्रमांक टिपता येतील. तसेच निकाल पडताळणीदेखील करता येईल. या फर्स्ट लेव्हल चेकिंग प्रक्रिया माध्यम प्रतिनिधींना पाहता येईल. सदरची प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली होणार आहे.