शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

छावणीतील विनापरवानगी होर्डिंग्जची तपासणी

By admin | Updated: January 7, 2015 01:04 IST

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विनापरवानगी होर्डिंग्ज आणि कमानी लावून आचारसंहिता धाब्यावर बसवली गेल्याचे लोकमतने समोर आणल्यानंतर छावणी परिषदेचे प्रशासन जागे झाले.

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विनापरवानगी होर्डिंग्ज आणि कमानी लावून आचारसंहिता धाब्यावर बसवली गेल्याचे लोकमतने समोर आणल्यानंतर छावणी परिषदेचे प्रशासन जागे झाले. आचारसंहिताभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी परिषदेने होर्डिंग्ज आणि कमानींची तपासणी सुरू केली आहे. गल्लोगल्ली जाऊन परिषदेचे कर्मचारी कुणी-कुणी आणि कुठे विनापरवानगी होर्डिंग्ज लावले याची माहिती जमा करीत आहेत. छावणीत उमेदवारांनी निवडणूक विभागाची परवानगी न घेताच प्रचाराच्या शेकडो कमानी, होर्डिंग्ज आणि झेंडे लावले आहेत. तसेच घराघरांवर स्टीकर्स आणि पोस्टर्सही चिकटविले जात आहेत. याविषयी लोकमतने काल वृत्त प्रकाशित केले. आचारसंहिताभंगाची गंभीर बाब लक्षात आल्यानंतर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आता याकडे लक्ष दिले आहे. आचारसंहिताभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता यावी यासाठी परिषदेने छावणीत होर्डिंग्ज आणि कमानींच्या सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. छावणी परिषदेच्या निवडणुकीत यावेळी तब्बल ४६ उमेदवार रिंगणात आहेत. यातील जवळपास सर्वच उमेदवारांनी मोठमोठे होर्डिंग्ज आणि कमानी लावल्या आहेत. विशेष म्हणजे धार्मिक स्थळांच्या परिसरातही प्रचाराच्या होर्डिंग्जचे पीक आले आहे.