विद्यार्थ्यांना फसविले; मान्यता नसतानाही दिला प्रवेश
By Admin | Updated: December 15, 2014 00:43 IST2014-12-15T00:33:09+5:302014-12-15T00:43:51+5:30
लातूर : रेणापूर तालुक्यातील दवणगाव येथील अध्यापक विद्यालयास शासन मान्यता नसतानाही ‘अध्यापक विद्यालयात प्रवेश देतो’ म्हणून खोटी माहिती सांगून व खोट्या पावत्या तयार करुन विद्यार्थ्यांकडून

विद्यार्थ्यांना फसविले; मान्यता नसतानाही दिला प्रवेश
लातूर : रेणापूर तालुक्यातील दवणगाव येथील अध्यापक विद्यालयास शासन मान्यता नसतानाही ‘अध्यापक विद्यालयात प्रवेश देतो’ म्हणून खोटी माहिती सांगून व खोट्या पावत्या तयार करुन विद्यार्थ्यांकडून १ लाख ८० हजार रुपये घेवून त्याची फसवणूक केली. या प्रकरणी रवण लहाने यांनी शुक्रवारी रेणापूर पोलिसात फिर्याद दिली़
दवणगाव येथे अध्यापक विद्यालयात ७ आॅक्टोबर २०१२ ते ७ एप्रिल २०१३ या कालावधीत अध्यापक विद्यालयात शासनाची मान्यता नसताना ‘अध्यापक विद्यालयात प्रवेश देतो’ म्हणून खोटी माहिती सांगून खोटे दस्ताऐवज व खोट्या पावत्या तयार करुन विद्यार्थ्यांकडून १ लाख ८० हजार रुपये घेऊन विद्यार्थ्याची व शासनाची फसवणूक केली़ तसेच विद्यार्थ्याचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान करुन नमूद रक्कम महाविद्यालयाकडे भरणा करणे गरजेचे असताना संगनमताने उपरोक्त रकमेचा अपहार केला़ या प्रकरणी राजीव गांधी महाविद्यालय पोहरेगाव येथील प्राचार्य रवण माधवराव लहाने (वय ३५) यांनी रेणापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार कलम ४२०, ४०९, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादंविनुसार रेणापूर पोलिसात बाबुराव कुंडलिक मुंडे व अन्य आठ (रा़ वंजारवाडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ (प्रतिनिधी)