स्वस्तधान्य गोदामाची तपासणी सुरू...!
By Admin | Updated: April 17, 2017 23:39 IST2017-04-17T23:37:53+5:302017-04-17T23:39:10+5:30
परतूर : तहसीलच्या स्वस्त धान्य मालाच्या गोदामाची विविध पथका मार्फत सुरू आहे.

स्वस्तधान्य गोदामाची तपासणी सुरू...!
परतूर : तहसीलच्या स्वस्त धान्य मालाच्या गोदामाची विविध पथका मार्फत सुरू आहे. हे पथक औरंगाबाद व परभणी येथील असल्याचे सांगण्यात येते.
तालुक्यात शंभराहून अधिक स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानांना गहू, तांदूळ, साखर आदी माल या गोडवून मधून पुरवला जातो. मागे शेतकऱ्यांसाठी येत असलेला गहू व तांंदूळ अचानक बंद झाला. पुन्हा दोन महिन्यांनी एकदाच आला. हा गहू व तांदूळ वाटप झाला की, नाही याची तपासणी या पथकामार्फत करण्यात येत आहे.
तसेच सर्व स्वस्त धान्य दुकानदार पूर्ण माल नेतात का, आलेल्या मालाचे वजन बरोबर आहे का, कमी अधिक वजन असेल तर हा भुर्दंड नेमका कोणाला आदी बाबींचीही तपासणी या पथकामार्फत होण्याची शक्यता आहे. दि. १६ एप्रिल रोजी औरंगाबाद येथील पथकाने या गोदामाची तपासणी केली तर, १७ रोजी परभणी येथील पथकाने तपासणी केली आहे.