चव्हाण - कुंटूरकर युती फायद्याची

By Admin | Updated: May 18, 2014 01:25 IST2014-05-18T01:17:53+5:302014-05-18T01:25:30+5:30

कॉंग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण, राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते गंगाधरराव कुटूंरकर यांच्यात झालेली ‘युती’ नायगाव मतदारसंघातून मतांची आघाडी कमी मिळण्यास अशोकरावांना फायद्याची ठरली.

Chavan - Family friendly coalition beneficial | चव्हाण - कुंटूरकर युती फायद्याची

चव्हाण - कुंटूरकर युती फायद्याची

नांदेड लोकसभा निवडणूक निमित्ताने कॉंग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण, राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते गंगाधरराव कुटूंरकर यांच्यात झालेली ‘युती’ नायगाव मतदारसंघातून मतांची आघाडी कमी मिळण्यास अशोकरावांना फायद्याची ठरली. या मतदारसंघातून भाजपाचे डी. बी. पाटील यांना ३ हजार ८४६ मतांची आघाडी मिळाली. आ. वसंतराव चव्हाण, माजी जि.प. सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनीही आपआपल्या परिने प्रचारयंत्रणा राबविली. प्रचाराच्या निमित्ताने अशोकराव चव्हाण यांनी नायगाव येथे युवकांशी संवाद साधला, यामुळे युवकांची मते कॉंग्रेसच्या पारड्यात झुकविण्यास अशोकरावांना यश मिळाले. नाही म्हणायला नायगाव मतदारसंघात नरेंद्र मोदींची लाट होती, मात्र एक तरुण नेतृत्व राज्यपातळीवर जिल्ह्याचे नेतृत्व करतो, विकासकामे खेचून आणू शकतो, भविष्याच्या राजकारणात त्यांना चांगले भवितव्य आहे, हे लक्षात घेवून बुद्धिवान मंडळी, तरुण मतदार अशोकरावांकडे वळला, त्याचा फायदा अशोकरावांना निश्चितच झाला, असे म्हणावे लागेल. याशिवाय नरसीचे भगवानराव भिलवंडे, राजेश कुटुंरकर आदींनीही अशोेकरावांसाठी प्रचार केला. मात्र, मोदींच्या लाटेचा फायदा भाजपाचे डी. बी. पाटील यांना झाला. त्यांना एकूण ८० हजार १५० तर अशोकराव चव्हाण यांना ७६ हजार ३०४ मते मिळाली. येथे भाजपाला ३ हजार ८४६ चे मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते़ याशिवाय निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अशोकरावांनी नायगाव येथे मोठी सभा घेतली. सभेला महिलांची चांगली उपस्थिती होती. नांदेडमधून ज्यांनाही उमेदवारी मिळेल, त्यांचा नेटाने प्रचार केला जाईल, असे उपस्थितांनी सांगितले. कॉंग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते गंगाधरराव कुंटूरकर यांची भेट घेतली आणि बेरजेचे राजकारण केले. येथूनच नायगाव मतदारसंघातील प्रचाराचे वारे फिरले. प्रचारानिमित्ताने अशोकराव व गंगाधरराव कुंटूरकर एकाच व्यासपीठावर आले. यानिनिमीत्ताने चांगला संदेश कार्यकर्त्यांपर्यत पोहोचला. मताधिक्य कमी होण्यास मदत मिळाली.

Web Title: Chavan - Family friendly coalition beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.