शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दांडीबहाद्दरांना चपराक

By admin | Updated: November 29, 2014 00:30 IST

बीड : जिल्हा परिषदेत नियमबाह्यपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीईओ नामदेव ननावरे यांनी शुक्रवारी खणखणीत चपराक दिली़ साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयात पाऊलही

बीड : जिल्हा परिषदेत नियमबाह्यपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीईओ नामदेव ननावरे यांनी शुक्रवारी खणखणीत चपराक दिली़ साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयात पाऊलही न ठेवणाऱ्या १३१ कर्मचाऱ्यांकडून खुलासे मागविण्यात आले आहेत़ त्यांचे एक दिवसाचे वेतनही कपात केले जाणार आहे़ उल्लेखनीय म्हणजे सायंकाळी पाच वाजता त्यांनी या सर्व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन ‘हजेरी’ घेत खरडपट्टी काढली़शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच सीईओ ननावरे जि़प़ मध्ये दाखल झाले़ त्यांनी सव्वा दहा वाजता सर्व विभागांतील हजेरीरजिस्टर मागविले़ त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत हजेरीरजिस्टर त्यांच्या कार्यालयात गोळा झाले़ कर्मचाऱ्यांमार्फत पडताळणी केली तेव्हा सुमारे १३१ कर्मचाऱ्यांच्या हजेरी रजिस्टरवर स्वाक्षऱ्याच नव्हत्या़ सकाळी १० ते सायंकाळी ५:४५ असा जि़प़ चा कार्यालयीन कामकाजाचा वेळ आहे़ दुपारी २ ते २:५० या वेळेत जेवणासाठी सुटी दिली जाते़ मात्र, कार्यालयीन कामकाजाच्या वेळा खूपच कमी कर्मचारी पाळतात़ ननावरे यांनी घेतलेल्या हजेरीत दांडीबहाद्दरांचे पितळ उघड झाले़ दांडीबहाद्दरांना सीईओ ननावरे यांनी विभाप्रमुखांमार्फत दोन दिवसांत खुलासे सादर करण्याच्या सूचना दिल्या असून असमाधानकारक खुलासे आल्यास एक दिवसांचे वेतन कापण्याची तंबी दिली आहे़दरम्यान, ननावरे यांनी दांडीबहाद्दारांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या़ कामकाजाचा आढावाही घेतला़ (प्रतिनिधी)सीईओ ननावरे यांनी रुजू झाल्यापासून प्रशासकीय कामकाजात सुधारणेच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे़ ४नियमबाह्य कामांना ‘ब्रेक’ लावण्याबरोबरच ढेपाळलेल्या प्रशासनाला ताळ्यावर आणण्यासाठी त्यांनी शिस्तीचा नवा ‘पाठ’ घालून दिला आहे़ ४मात्र, कर्मचाऱ्यांच्या अंगवळणी पडलेला ‘लेटलतीफ’ कारभार आणखी काही पूर्णपणे सुधारलेला नाही़४सीईओ ननावरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कामाच्या वेळेत कोणी गैरहजर राहत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही़ आज फक्त नोटिसा दिल्या़ यानंतर एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई देखील करावी लागेल़नियमबाह्य कामांसाठी प्रसिद्ध असलेला वित्त व लेखा विभाग दांड्या मारण्यातही अव्वल ठरला़ सर्वाधिक २८ कर्मचारी गैरहजर होते़ आरोग्य विभागातही याहून वेगळी स्थिती नव्हती़ तेथील २४ जण गायब होते़ शिक्षण, बांधकाम वर्ग २, लघुपाटबंधारे, लघुपाटबंधारे उपविभाग येथील प्रत्येकी १० कर्मचारी अनुपस्थित होते़ बांधकाम उपविभागातील ९, बांधकाम वर्ग १ मधील ८ कर्मचाऱ्यांची गैरहजेरी होती़ समाजकल्याण, कृषी विभागातील प्रत्येकी ६ कर्मचारी गायब होते़ पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन विभागातील प्रत्येकी ४ कर्मचाऱ्यांचा आतापता नव्हता़ ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील २ कर्मचारीही गैरहजर होते़