चापानेर येथे बिबट्याने पाडला हरणाचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:02 IST2021-09-21T04:02:07+5:302021-09-21T04:02:07+5:30

सोमवारी शिकारे वस्तीवर राहत असलेले कचरू नारायण पवार हे आपल्या गट नं. ४४७ मधील उसाच्या शेतात दुपारी दोन वाजण्याच्या ...

At Chapaner, a leopard killed a deer | चापानेर येथे बिबट्याने पाडला हरणाचा फडशा

चापानेर येथे बिबट्याने पाडला हरणाचा फडशा

सोमवारी शिकारे वस्तीवर राहत असलेले कचरू नारायण पवार हे आपल्या गट नं. ४४७ मधील उसाच्या शेतात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गेले होते. तेथे त्यांना हरीण मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी तत्काळ ही घटना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविली. वनरक्षक नारायण ताठे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सदर हरिणाचा बिबट्याने फडशा पाडल्याचे त्यांनी सांगितले. वस्तीवरील नागरिकांना सतर्क राहून बिबट्याच्या हल्ल्यातून बचाव करण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

चौकट

उसामुळे वाढला बिबट्याचा वावर

लघु तलावात दोन वर्षांपासून पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. घटनास्थळी मृत हरिणाचा पंचनामा करून विल्हेवाट लावण्यात आली. बिबट्यामुळे वस्तीवरील नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: At Chapaner, a leopard killed a deer