‘बदल रहा है व्यापार, क्या आप है तयार’

By Admin | Updated: August 15, 2014 01:11 IST2014-08-15T00:40:44+5:302014-08-15T01:11:18+5:30

औरंगाबाद : आपल्या व्यापारात बदल घडवून आणण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी प्रख्यात बिझनेस गुरू राकेश जैन यांचे चर्चासत्र १६ आॅगस्ट रोजी आयोजित केले आहे.

'Changing business, you have to create' | ‘बदल रहा है व्यापार, क्या आप है तयार’

‘बदल रहा है व्यापार, क्या आप है तयार’

औरंगाबाद : काळासोबत व्यवसायाचे स्वरूपही बदलत आहे. त्यानुसार आपल्या व्यापारात बदल घडवून आणण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी प्रख्यात बिझनेस गुरू राकेश जैन यांचे चर्चासत्र शनिवारी १६ आॅगस्ट रोजी आयोजित केले आहे.
उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी ९.३० वाजता चर्चासत्राला सुरुवात होणार आहे. ‘बदलोगे तो बढोगे’, बदल रहा है व्यापार... क्या आप है तयार ! या विषयावर प्रख्यात बिझनेस गुरू राकेश जैन सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. हे चर्चासत्र सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आले आहे.
इच्छुकांनी चर्चासत्र सुरू होण्याच्या १० मिनिटे अगोदर रंगमंदिरात हजर राहावे, असे आवाहन भारतीय जैन संघटना औरंगाबाद, जिल्हा व ग्रामीण शाखा, जैन सोशल ग्रुप, जितो मराठवाडा चॅप्टर, महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटी, जैन इंजिनिअर्स सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे मीडिया पार्टनर लोकमत आहे.
व्यवसाय टिकवायचा कसा?
स्पर्धा वाढल्याने व्यवसाय करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. जो काळानुसार व्यवसायात बदल घडवून आणत नाही, तो स्पर्धेतून बाहेर फेकल्या जात आहे. यामुळे व्यावसायिकांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
व्यवसायाची गती
कशी वाढवाल?
आपल्या व्यवसायाची गती कशी वाढेल? बदलत्या व्यापाराच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण तयार आहोत का? या सर्व प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन बिझनेस गुरू करणार आहेत. हे चर्चासत्र आपल्या जीवनात परिवर्तन घडवू शकते.

Web Title: 'Changing business, you have to create'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.