चंद्रदर्शन झाले, रमजान आजपासून

By Admin | Updated: June 30, 2014 01:02 IST2014-06-30T01:00:13+5:302014-06-30T01:02:15+5:30

औरंगाबाद : रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले आणि शहरात आनंदाचे वातावरण पसरले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ‘रमजान मुबारक हो’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या.

Chandrasaan, Ramadan is from today | चंद्रदर्शन झाले, रमजान आजपासून

चंद्रदर्शन झाले, रमजान आजपासून

औरंगाबाद : रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले आणि शहरात आनंदाचे वातावरण पसरले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ‘रमजान मुबारक हो’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या. चंद्र दिसल्यावर ‘तरावीह’च्या विशेष नमाजमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. उद्या सोमवार ३० जून रोजी रमजानचा पहिला रोजा असणार आहे.
सोमवारी पहिला रोजा असल्याने ‘सहरी’ (रोजा ठेवण्यासाठी सूर्योदयापूर्वी करण्यात येणारे जेवण) च्या तयारीला सुरुवात झाली. रविवारी चंद्राचे दर्शन होणार हे निश्चित होते, त्यामुळे सकाळपासूनच विविध सामान खरेदीसाठी बाजारपेठेत मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. विशेषत: पेंडखजूर, दूध, दुग्धजन्य पदार्थ व फळ खरेदीसाठी सायंकाळी दुकानावर गर्दी झाली होती. शहरातील मुस्लिम भागात रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी होती. नागरिक आवश्यकतेनुसार खाद्यपदार्थ आदी सामान खरेदी करण्यात मग्न झाले होते. तसे मागील १५ ते २० दिवसांपासून रमजानची तयारी सुरू झाली होती. चंद्रदर्शन झाल्यामुळे ३० जूनपासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे. रमजान महिन्यात रात्रीची नमाज अर्थात ‘ ईशा’ की नमाजसोबत पढल्या जाणारी विशेष नमाज ‘तरावीह’ची तयारी करण्यात आली. ‘तरावीह’साठी ‘हाफीज’ची नियुक्तीही पूर्वीच करण्यात आली. चंद्रदर्शन होताच मशिदीत ‘तरावीह’ची नमाज पढली.
मशिदीशिवायही काही ठिकाणी ‘तरावीह’ च्या नमाजची व्यवस्था करण्यात आली होती. रमजान महिन्याला तीन भागात (अशरा) वाटण्यात येते. यात पहला ‘अशरा’अर्थात दहा दिवस ‘रहमत’चे असतात. ‘कुराण’ व ‘रमजान’चा हा संबंध लक्षात घेता, विशेष नमाज ‘तरावीह’ मध्ये ‘कुराण’ पाठ करण्यात येत आहे. सामान्यत: मशिदीमध्ये दररोज सवा ‘पारा’(कुराणचा हिस्सा) पासून तीन ‘पारे’पर्यंत पठण केल्या जाते. काही ठिकाणी पाच ते सहा ‘पारे’ पर्यंत पठणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Chandrasaan, Ramadan is from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.