चंद्रपूरची स्लीपर शिवशाही होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:35 IST2019-04-05T22:35:32+5:302019-04-05T22:35:49+5:30

एसटी महामंडळाच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील राज्यभरातील काही स्लीपर शिवशाही बस कमी भारमानामुळे सेवेतून कमी करण्यात येत आहेत.

Chandrapur's sleeper Shivsahi will be closed | चंद्रपूरची स्लीपर शिवशाही होणार बंद

चंद्रपूरची स्लीपर शिवशाही होणार बंद

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील राज्यभरातील काही स्लीपर शिवशाही बस कमी भारमानामुळे सेवेतून कमी करण्यात येत आहेत.

यामध्ये चंद्रपूर-औरंगाबाद आणि औरंगाबाद-चंद्रपूर या बसचा समावेश आहे. एप्रिल महिन्यातील ज्या शेवटच्या दिवसाचे आगाऊ आरक्षण झालेले असेल, त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून आरक्षण बंद करण्यात यावे, अशी सूचना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. औरंगाबाद विभागातील मात्र एकही स्लीपर शिवशाही बस बंद होणार नसल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Chandrapur's sleeper Shivsahi will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.