शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

कुलगुरूंच्या चौकशी समितीने आर्थिक कागदपत्रे तपासली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 4:46 PM

आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने शुक्रवार आणि शनिवारी ठाण मांडून आर्थिक गैरव्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी केली

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात नियुक्त्यांमध्ये गडबड, आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने शुक्रवार आणि शनिवारी ठाण मांडून आर्थिक गैरव्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कारभाराविषयी विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधींसह ३९ जणांनी राज्यपाल कार्यालयाकडे पुराव्यानिशी तक्रारी केल्या आहेत. यावर राज्यपालांनी कुलगुरूंच्या कार्यकाळातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली.

या चौकशी समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. एस.एफ. पाटील, सदस्य डॉ. गोविंद कथलाकुट्टे आणि डॉ. बी.बी. पाटील हे शुक्रवारी दुपारी विद्यापीठात दाखल झाले होते. या समितीने चार कोटी रुपयांची उचल, उत्तरपत्रिका, रुसाअंतर्गत यंत्रांची खरेदी आदी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी केली असल्याचे समजते. याविषयीची कागदपत्रेही समितीने हस्तगत केली आहेत. पहिल्या भेटीत समितीने अभ्यास मंडळावर सदस्यांच्या केलेल्या नेमणुका, प्रभारी अधिष्ठातांना दिलेले अमर्याद अधिकार याविषयीची कागदपत्रे हस्तगत केली होती. यानंतर दुसऱ्या भेटीत आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांची कागदपत्रे हस्तगत केल्याची चर्चा आहे.

राज्यपाल कार्यालयांची चार पत्रेअभ्यास मंडळाच्या नियुक्तीसंदर्भात दाखल तक्रारींच्या अनुषंगाने राज्यपाल कार्यालयाने विद्यापीठ प्रशासनाला चार पत्रांद्वारे तात्काळ खुलासा पाठविण्याचे आदेश दिले. यामुळे कुलसचिव, कुलगुरू कार्यालय या पत्रांना कोणता खुलासा पाठवायचा याचीच दोन दिवसांपासून तयारी करीत आहेत. सुटीच्या दिवशीही विधिज्ञांचा सल्ला घेण्यात येत होता. यातच व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत प्रभारींना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. त्यासंदर्भातही नोटिसा मिळाल्या आहेत. कुलगुरूंची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या कामकाजाने वेग घेतला असून, समितीने विविध प्रकरणांच्या कागदपत्रांची मागणी केली. यातच राज्यपाल कार्यालयाने चार पत्रे पाठविल्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली आहे.

कुलगुरूंना चार वर्षे पूर्णविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कारकीर्दीला सोमवारी (दि.४) चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी ४ जून २०१४ रोजी कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला होता. उच्चस्तरीय चौकशी समिती, भ्रष्टाचारांचे आरोप, चार वर्षांत एकही पूर्णवेळ अधिकारी नेमला नाही. प्रशासन, शैक्षणिक घडी विस्कटलेली असल्यामुळे कोणत्याही प्रकारे चार वर्षे पूर्ण झाल्याचा गाजावाजा करण्यात आलेला नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादState Governmentराज्य सरकारTeacherशिक्षक