शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंचा वाढला ताण

By admin | Updated: January 23, 2015 00:58 IST

औरंगाबाद : विद्यापीठात मागील १५ दिवसांपासून कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांच्या नेमणुकांवरून गोंधळाचे वातावरण आहे. संघटनांच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे

औरंगाबाद : विद्यापीठात मागील १५ दिवसांपासून कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांच्या नेमणुकांवरून गोंधळाचे वातावरण आहे. संघटनांच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे कुलगुरूंनामानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. हे नसे थोडके म्हणून की काय, व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य उल्हास उढाण यांना अपात्र ठरवून त्यांच्या जागेवर नेमणूक करण्यासाठी पात्र तीन जणांची नावे पाठवावीत, या आशयाचे पत्र राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरूंना प्राप्त झाले आहे.व्यवस्थापन परिषदेवर यापूर्वी ‘वोखार्ड’ चे वरिष्ठ अधिकारी डॉ. महाराज किशन साहिब हे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कार्यरत होते. दैनंदिन कामकाजामुळे अलीकडे त्यांना व्यवस्थापन परिषदेचे काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत:हून कुलगुरूंकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यपाल कार्यालयाने उल्हास उढाण यांची आॅगस्ट महिन्यात व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती केली. दोन महिन्यांनंतर उढाण यांच्या नियुक्तीस अधिसभा सदस्य गजानन सानप यांनी आक्षेप घेतला होता. सानप यांच्या आक्षेपाची दखल घेऊन राज्यपाल कार्यालयाने २९ डिसेंबर रोजीच्या पत्रानुसार उल्हास उढाण यांना राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापन परिषदेवर अपात्र ठरविले आहे. ते व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यत्वाचे निकष पूर्ण करू शकत नाहीत, असे पत्रात नमूद करण्यात आले असून, कुलगुरूंनी उल्हास उढाण यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तीन जणांची नावे राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्याचे सूचित करण्यात आलेले आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १४ सप्टेंबर २००९ च्या अध्यादेशानुसार व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी पात्रतेचे निकष ठरविले आहेत. त्या निकषानुसारच तिन्ही नावे पाठविण्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यपाल कार्यालयाने २९ डिसेंबर रोजी हे पत्र कुलगुरू कार्यालयास पाठविले आहे. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या तीन बैठका विद्यापीठाने घेतल्या आहेत. त्या तिन्ही बैठकांना कुलगुरूंनी रीतसर आपणास निमंत्रित केल्याचे उल्हास उढाण यांचे म्हणणे आहे. आपणास आतापर्यंत अपात्रतेबद्दल कुलगुरूंनी कळविले नसल्याचेही ते म्हणतात. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप गोटातून व्यवस्थापन परिषदेवर जाण्यासाठी अनेक जण बाशिंग बांधून असल्याची माहितीही समोर आली आहे. १कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे राज्यपाल कार्यालयाच्या पत्राबद्दल खातरजमा करण्यासाठी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.