शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

जलजीवन मिशनसमोर अडचणी; डिसेंबरअखेरपर्यंत १,२४१ गावांना नळाने पाणी हे दिवास्वप्नच

By विजय सरवदे | Updated: July 19, 2023 11:30 IST

‘जलजीवन मिशन’ या योजनेतून सन २०२४ मध्ये नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ग्रामीण भागातील चार लाख ८७ हजार ९११ घरांना नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे जलजीवन मिशनचे उद्दिष्ट आहे. तथापि, अडथळ्यांची शर्यत पार करत जि.प. पाणीपुरवठा विभागाची घोडदौड सुरू असली तरी डिसेंबर २०२३ अखेपर्यंत या योजनेचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता धुसर झाली आहे. प्रामुख्याने सातत्याने पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणाऱ्या १,२४१ गावांना ‘जलजीवन मिशन’ या योजनेतून सन २०२४ मध्ये नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात १,१६१ योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये कमीत कमी २५ हजार लिटर क्षमतेपासून जास्तीत जास्त एक लाख लिटरपर्यंत सुमारे सव्वाआठशे जलकुंभ (पाण्याची टाकी), तलाव परिसरात २५० विहिरी, विहिरीपासून टाकीपर्यंत जलवाहिनी व घरापर्यंत नळजोडणी या कामांचा समावेश आहे.

मात्र, या सरकारी योजनेला सरकारी कार्यालयांकडूनच खोडा घातला असल्यामुळे ही योजना थोडी बॅकफूटवर गेली. तलाव परिसरापासून २०० मीटर क्षेत्रात विहीर घेण्यास सिंचन विभागाने आडकाठी निर्माण केली. त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सचिवालयापर्यंत संपर्क साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही त्यास लेखी स्वरूपात परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे जि.प. यंत्रणेने २०० मीटरच्या आत विहिरींची कामे सुरू केली आहेत. दुसरीकडे, या योजनेचे काम थेट जि.प. पाणीपुरवठा विभागामार्फतच राबविण्यात येत असल्यामुळे काही सरपंच दुखावले गेले आहेत. काहींनी टक्केवारीसाठी कंत्राटदारांकडे आग्रह धरला. काहीजण गरज नसेल, तेथे जीआय पाइपसाठी अडून बसले, त्यामुळे अनेक गावांमध्ये कामे थांबली. त्यामुळे ‘सीईओ’ मीना यांनी अशा सरपंचांना संपर्क साधून कामांना अडथळा आणू नये, अशी विनंती केली. तरीही काहींनी विरोध कायम ठेवला. अशा सरपंचांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मार्च २०२४ पर्यंत सर्वांना पाणीयासंदर्भात जि.प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले की, सध्या सर्व अडथळ्यांवर मात करत योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत. शासनाने डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत योजना मार्गी लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरीदेखील मार्च २०२४ पर्यंत ही योजना परिपूर्णपणे यशस्वी होईल.

- १,२४१ गावांसाठी ‘जलजीवन मिशन’ योजना- १,१६१ कामांचा अंतर्भाव- ५३ गावांना आतापर्यंत नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा सुरू- ६७७ कोटी सात लाखांचा अंदाजे खर्च- चार लाख ८७ हजार ९११ घरांना नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट- तीन लाख ६४ हजार १६५ घरांना आजपर्यंत नळजोडणी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद