आव्हान अस्तित्व टिकविण्याचे !

By Admin | Updated: October 3, 2014 23:56 IST2014-10-03T23:56:07+5:302014-10-03T23:56:07+5:30

संजय तिपाले , बीड जिल्हा परिषदेत २९-२९ अशी समसमान संख्या असताना राष्ट्रवादीने नशिबाच्या जोरावर सत्ता काबिज केली़ त्यामुळे भाजपाची निराशा झाली़ सभापतीपदाच्या निवडीही रोमांचक होतील अशी चिन्हे होती; प

Challenge survival! | आव्हान अस्तित्व टिकविण्याचे !

आव्हान अस्तित्व टिकविण्याचे !


संजय तिपाले , बीड
जिल्हा परिषदेत २९-२९ अशी समसमान संख्या असताना राष्ट्रवादीने नशिबाच्या जोरावर सत्ता काबिज केली़ त्यामुळे भाजपाची निराशा झाली़ सभापतीपदाच्या निवडीही रोमांचक होतील अशी चिन्हे होती; परंतु भाजपाच्या दोन सदस्या गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीचे काम सोपे झाले़ अध्यक्षनिवडीत फाटाफूट रोखण्यात दोन्ही पक्षांना यश आले होते़ मात्र, ‘बॅकफूट’वर गेलेल्या भाजपाला सभापती निवडीवेळी आपली ताकद दाखवता आली नाही़ त्यामुळे आता भाजपापुढे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान राहील़
भाजपाने राष्ट्रवादीतील नाराजांना आपल्या तंबूत खेचून सुरुवात तर धडाक्यात केली होती़ आ़ विनायक मेटे, माजी आ़ साहेबराव दरेकर, भीमराव धोंडे यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याने त्यांना जोडून तीन सदस्य आपोआप भाजपाशी जोडले गेले़ राष्ट्रवादीच्या सदस्या सविता मदन आहेर यांचे सदस्यत्व जातप्रमाणपत्रामुळे अडचणीत आले़ त्यामुळे राष्ट्रवादीला तांत्रिक धक्काही सहन करावा लागला़ पाठोपाठ रमेश आडसकरांनीही राष्ट्रवादीला हाबाडा देत भाजपाचा तंबू गाठला़ त्यांचे तीन सदस्य भाजपाला येऊन मिळाले़ त्यामुळे भाजपा सत्तेच्या काठावर येऊन ठेपली़ भाजपाकडे २९ तर राष्ट्रवादीकडेही तितकेच संख्याबळ झाले़ अध्यक्ष, उपाध्यक्षपद नशिबाने आघाडीकडे गेल़े़ सभापती निवडीत भाजपा- सेनेला संधी होती़ मात्र, कडा गटाच्या अनिता रवींद्र ढोबळे व पाचंग्री गटातील सदस्या उषा बंकट शिंदे यांनी गैरहजर राहणे पसंत केले़ त्यामुळे भाजपा अल्पमतात आली़
नोटिसा बजावणार
गैरहजर राहिलेल्या अनिता रवींद्र ढोबळे व उषा बंकट शिंदे यांना नोटीस बजावली जाणार असल्याचे भाजपाचे गटनेते मदनराव चव्हाण यांनी सांगितले़ त्यांच्या गैरहजेरीने भाजपाचे संख्याबळ कमी झाले़ त्यामुळे माघार घ्यावी लागली, असेही ते म्हणाले़
‘व्हिप’ का नाही?
अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवडीप्रसंगी भाजपा, राष्ट्रवादीने खूपच काळजी घेतली होती़ गटातटात विखुरलेल्या राष्ट्रवादीने ‘पॅचअप’ करण्यात यश मिळवले; परंतु भाजपा कमी पडली़ सभापती निवडीवेळी भाजपाने आपल्या सदस्यांना ‘व्हिप’ही बजावला नाही़ शिंदे, ढोबळे यांनी ऐनवेळी गैरहजेरी दर्शविली़ त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदापाठोपाठ सभापतीपदाचे स्वप्नही भंगले़

Web Title: Challenge survival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.