चाकूर बाजार समिती समस्यांच्या विळख्यात

By Admin | Updated: August 25, 2014 01:38 IST2014-08-25T00:42:45+5:302014-08-25T01:38:13+5:30

संदीप अंकलकोटे , चाकूर चाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. १० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या या समितीला वीज, पाणी, संरक्षण भिंत

Chakur Bazar Committee Report | चाकूर बाजार समिती समस्यांच्या विळख्यात

चाकूर बाजार समिती समस्यांच्या विळख्यात



संदीप अंकलकोटे , चाकूर
चाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. १० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या या समितीला वीज, पाणी, संरक्षण भिंत यासह अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यातच अनेक वर्षांपासून संचालक मंडळाची निवडणूक नसल्याने प्रशासकावरच या समितीचा कारभार सुरू आहे.
अहमदपूर कृउबाचे ५ आॅक्टोबर १९८७ ला विभाजन होऊन चाकूरची स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली. या समितीला १ हेक्टर २७ आर जमीन घेण्यात आली. नंतरच्या काळात चाकूर येथे ८ एकर तर नळेगाव येथे ३ हेक्टर जमीन बाजार समितीसाठी संपादित करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी मार्केट यार्ड चालू करण्याचा संकल्प तत्कालीन सभापतींचा होता. या समितीसाठी केंद्र सरकारकडून ४ लाख निधीही मिळाला होता. त्यावेळी १८ व्यापारी या समितीत व्यापार करीत. परंतु, त्यांना चांगल्या प्रकारे नफाही होत. परंतु, नंतरच्या काळात प्रशासक आले आणि बाजार समितीला अवकळा आली. अहमदपूरपेक्षा चाकूरची बाजार समिती अधिक उत्पन्न देणारी, इथे कापूस खरेदी केंद्रही सुरू करण्यात आले होते. त्यातून समितीला १ लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न मिळाले. नंतर जीनिंग व कापूस खरेदी केंद्र बंद पडले. यार्डाच्या जागेत व्यापार कसा तरी सुरू होता. चाकूर येथील अशोक पाटील यांनी शहरात आडत व्यापार सुरू करून बाजार समितीला बळ देण्याचा प्रयत्न केला. परंतु, येणारे उत्पन्न व त्यातून कर्मचाऱ्यांच्या पगारी सर्व खर्चात जात असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन थकले. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले. २००९ पासून या समितीवर प्रशासक आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकाच रखडल्या गेल्या आहेत. २००९ पासून निवडणुका नाहीत. निवडणुकीचे शुल्क भरले नसल्यामुळे या निवडणुका रखडल्या आहेत.

समितीच्या १ हेक्टर ३७ आर जमिनीत ६४ भूखंड पाडले आहेत. त्याचे वाटप झाले आहे. २०१३ मध्ये मार्केट यार्डाच्या जागेत व्यापारी गेले. ६४ भूखंडात काही व्यापाऱ्यांनी स्वत:चे आडत दुकान सुरू केले. सध्या बाजार समिती २० लाभधारक आडत व्यापारी आहेत. त्यापैकी १३ जणांना भूखंड नसल्याने समितीच्या खुल्या जागेवर शेड उभारून ते व्यापार करतात.
४चाकूरसह तीर्थवाडी, बोथी, अलगरवाडी, हणमंतवाडी, रोहिणा, उजळंब, नागेश्वरवाडी, लातूररोड, मोहनाळ, कडमुळी, आटोळा, सरसवाडी, हिंपळनेर, वडवळ नागनाथ, जानवळ आदी गावांसह ३० गावांतील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी येते येत होते. परंतु, बाजार समिती समस्यांच्या विळख्यात अडकल्यामुळे आता शेतकरी शेतीमालाच्या विक्रीसाठी लातूरगाठत आहेत.

Web Title: Chakur Bazar Committee Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.