चाकूहल्ला प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 17:12 IST2019-09-10T17:12:48+5:302019-09-10T17:12:57+5:30
तरुणावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध रविवारी रात्री वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाकूहल्ला प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
वाळूज महानगर : बजाजनगरात जुन्या वादातून तरुणावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध रविवारी रात्री वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतू यातील एकही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
राजू हरिभाऊ दहातोंड हा शनिवारी दुपारी कोलगेट चौकालगत एका हॉटेलमध्ये साप निघाल्याने सर्पमित्र संजय हिवराळेसोबत गेला होता. त्यानंतर राजू दुचाकीने कोलगेट चौकातून जात असताना योगेश प्रधान याने आवाज दिल्याने तो थांबला. त्याचवेळी कारमधून विलास जाधव, संतोष चंदन व एक अनोळखी इसम राजूजवळ गेले. याचवेळी योगेश प्रधानने राजूवर चाकूहल्ला केला.
पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक दीड किलोमीटर अंतरावर घटना घडली असतानाही दिवसभर गुन्हा दाखल केला नाही. रात्री उशिरा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात विलास जाधव, संतोष चंदन, योगेश प्रधान व एक अनोळखी अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.