पादचारी महिलेच्या दोन सोनसाखळी लांबविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:58 IST2017-10-01T23:58:40+5:302017-10-01T23:58:40+5:30

मावशीला भेटण्यासाठी बहिणीसह जाणाºया एका महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांच्या दोन सोनसाखळ्या दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्या.

Chain snatching on Beed bypass | पादचारी महिलेच्या दोन सोनसाखळी लांबविल्या

पादचारी महिलेच्या दोन सोनसाखळी लांबविल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मावशीला भेटण्यासाठी बहिणीसह जाणाºया एका महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांच्या दोन सोनसाखळ्या दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्या. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास बीड बायपास परिसरातील छत्रपतीनगरात घडली.
पोलिसांनी सांगितले की, सातारा परिसरातील दक्षिण विहार येथील रहिवासी सीमा देशमुख (५४) या शनिवारी रात्री त्यांच्या मावसबहिणीसह परिसरात राहणाºया मावशीच्या घरी पायी जात होत्या. शिदोरी हॉटेलच्या मागील गल्लीतून त्या जात असताना एक दुचाकीस्वार त्यांच्या समोरून पुढे गेला. यानंतर तो पुन्हा वळून परत आला. यावेळी या चोरट्याने सीमा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि नेकलेस असे साडेचार तोळ्याचे दागिने हिसकावले आणि तो दुचाकीने निघून गेला. यावेळी सीमा आणि त्यांच्या बहिणीने आरडाओरड केली. मात्र आसपास कोणीही नसल्याने चोरट्याला अडवले नाही. शिवाय त्याने हेल्मेट परिधान केलेले होते. या घटनेची माहिती देशमुख यांनी नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली. सातारा ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे आणि चार्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर परिसरात नाकाबंदी केली. चोरटा रात्री उशिरापर्यंत हाती लागला नाही. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

Web Title: Chain snatching on Beed bypass