वॉरियर्स फेन्सिंग क्लबतर्फे साखळी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:09 IST2017-12-09T01:08:51+5:302017-12-09T01:09:26+5:30

औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेशी संलग्नित वॉरियर्स फेन्सिंग क्लबतर्फे ११ व १२ डिसेंबदरम्यान विभागीय क्रीडा संकुल येथे साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 Chain competition by Warriors Fensing Club | वॉरियर्स फेन्सिंग क्लबतर्फे साखळी स्पर्धा

वॉरियर्स फेन्सिंग क्लबतर्फे साखळी स्पर्धा

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेशी संलग्नित वॉरियर्स फेन्सिंग क्लबतर्फे ११ व १२ डिसेंबदरम्यान विभागीय क्रीडा संकुल येथे साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शिवनेरी फेन्सर्स, रायगड फेन्सर्स, सिंहगड फेन्सर्स व देवगिरी फेन्सर्स या संघातील १२, १४ व १८ वर्षांखालील एकूण ११0 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाºया संघांचे प्रशिक्षक म्हणून अजय त्रिभुवन, तुषार आहेर, स्वप्नील तांगडे, राहुल दणके व सागर मगरे असणार आहेत. दोन दिवस चालणारी ही स्पर्धा दुपारी ४ ते रात्री ९.३0 वाजेपर्यंत प्रकाशझोतात रंगणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, आयोजन समितीचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, संजय भूमकर, वॉरियर्स फेन्सिंग क्लबचे सचिव सागर मगरे, स्वप्नील शेळके व सूरज लिपणे आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title:  Chain competition by Warriors Fensing Club