तीन हजार फेरीवाल्यांना प्रमाणपत्र
By Admin | Updated: April 11, 2015 00:19 IST2015-04-11T00:10:00+5:302015-04-11T00:19:52+5:30
लातूर : लातूर शहर महानगरपालिका फेरीवाला समितीची बैठक शुक्रवारी मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ लातूर शहरात

तीन हजार फेरीवाल्यांना प्रमाणपत्र
लातूर : लातूर शहर महानगरपालिका फेरीवाला समितीची बैठक शुक्रवारी मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ लातूर शहरात यापूर्वी सर्व्हेक्षण केलेल्या ३ हजार ४६ फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला़
लातूर शहरात हॉकर्स झोन कोठे असावेत व कोठे नसावेत, याबाबतचे सर्व्हेक्षण करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले़ तसेच फेरीवाला समिती सदस्यांना ओळखपत्र देण्याचे ठरविण्यात आले़ या बैठकीस मनपा उपायुक्त एस़पी़वाघमारे, सहआयुक्त प्रदीप टेंगल, आरोग्याधिकारी डॉ़महेश पाटील, गौस गोलंदाज, मधुकर काळदाते, वर्षा साळुंके, त्र्यंबक स्वामी, साहेरा सय्यद, एजाजखाँ पठाण, शरद डुमने, विजय गोरे, रविंद्र तारे, पद्मा खंडेलवाल, सुपर्ण जगताप, अॅड़ शुभदा रेड्डी, कृष्णकुमार बांगड, बाजपाई, देवकुळे आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)