सीईओंचा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी धुडकावला !
By Admin | Updated: September 23, 2014 23:42 IST2014-09-23T23:39:38+5:302014-09-23T23:42:46+5:30
बीड : शिक्षकांच्या तात्पुरत्या पदोन्नत्या सीईओ राजीव जवळेकर यांनी एका आदेशाद्वारे रद्द केल्या होत्या़ मात्र शिक्षणाधिकारी (प्रा़) व्ही़ डी़ कुलकर्णी यांनी या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवल्ला आहे़

सीईओंचा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी धुडकावला !
बीड : शिक्षकांच्या तात्पुरत्या पदोन्नत्या सीईओ राजीव जवळेकर यांनी एका आदेशाद्वारे रद्द केल्या होत्या़ मात्र शिक्षणाधिकारी (प्रा़) व्ही़ डी़ कुलकर्णी यांनी या आदेशाला चक्क केराची टोपली दाखविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
दोन वर्षापूर्वी जि़ प़ च्या प्राथमिक विभागाने ३५० ते ४०० शिक्षकांना नियम डावलून तात्पुरत्या पदोन्नत्या दिल्या होत्या़ त्यानंतर २५ आॅगस्ट २०१४ रोजी सीईओ जवळेकर यांनी सर्व पदोन्नत्या रद्दचे आदेश दिले होते़ मात्र शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी सीईओंच्या आदेशाचे पालन तर केलेच नाही उलट त्या शिक्षकांची पाठराखण केली आहे़
शिक्षणाधिकारी कुलकर्णी म्हणाले, १२ शिक्षक न्यायालयात गेले आहेत़ न्यायालयाने तीन महिन्यात निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे़ त्यामुळे कोणाचीही पदोन्नती रद्द केलेली नाही़ सीईओंकडे मार्गदर्शन मागविलेले आहे़ लवकरच निर्णय घेण्यात येईल़ (प्रतिनिधी)