स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक पुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:04 IST2021-04-09T04:04:46+5:302021-04-09T04:04:46+5:30

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत शहरातील स्वच्छतेच्या कामाचे सर्वेक्षण करण्यासाठी मागील महिन्यात १२ जणांचे केंद्रीय पथक शहरात आले होते. ...

Central team re-admitted for clean survey | स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक पुन्हा दाखल

स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक पुन्हा दाखल

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत शहरातील स्वच्छतेच्या कामाचे सर्वेक्षण करण्यासाठी मागील महिन्यात १२ जणांचे केंद्रीय पथक शहरात आले होते. ‘कचरामुक्त शहर’ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन पथक संपूर्ण शहरात सर्वेक्षण करणार होते, पण वाढता कोरोना संसर्ग पाहता पथकाने काम थांबवले व सर्वेक्षणाचे काम पुढे ढकलण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती. त्यांची ही मागणी मंजूर होताच पथक तातडीने परत गेले. त्यानंतर बुधवारी आठजणांचे दुसरे पथक शहरात दाखल झाले. गुरुवारी सकाळी या पथकाने महापालिकेने शहरातील स्वच्छतेसंदर्भात केलेल्या कामांच्या कागदपत्रांची पाहणी केली. शुक्रवारी हे पथक शहरात पाहणी करणार आहे. पाहणीसाठीचे भाग अचानक ठरविले जाणार असून, ज्या भागात कोरोना संसर्ग कमी आहे, तोच भाग स्वच्छतेच्या पाहणीसाठी निवडला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Central team re-admitted for clean survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.