शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांचे ठाण

By admin | Updated: October 12, 2014 00:44 IST

लातूर : मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाची पोलचिट एक पुरावा आहे. त्यामुळे रविवारी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष ठाण मांडून राहणार आहेत.

लातूर : मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाची पोलचिट एक पुरावा आहे. त्यामुळे रविवारी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष ठाण मांडून राहणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवरून मतदारांना आयोगाची पोलचिट देण्यात येणार आहे. मतदारांकडे पोलचिट पोहोचली नसेल, तर मतदान केंद्रांवरून ती प्राप्त करावी, असे आवाहन लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेवाळे यांनी केले आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात एकूण ३०९ मतदान केंद्र आहेत. या ३०९ मतदान केंद्रांवर रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान अधिकारी थांबणार आहेत. मतदान अधिकाऱ्यांकडे आयोगाने छापलेली पोलचिट असेल. यापूर्वी आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन आयोगाचे पोलचिट वाटप केले आहे. परंतु, अद्यापही अनेक मतदारांपर्यंतपोलचिट गेले नाही. त्यामुळे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक केंद्रांवर रविवारी मतदान अधिकारी थांबणार आहेत. ज्या मतदारांना मतदान चिठ्ठी मिळाली नाही, त्यांना ती केंद्रावर जाऊन प्राप्त करता येणार आहे. सकाळी १० वाजता लोक घराबाहेर पडतात. सायंकाळीही ६ वाजेच्या सुमारास बाहेर पडतात. रविवार सुटीचा दिवस असल्याने वेळही मिळतो. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर हा उपक्रम लातूर शहर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार आहे. ज्यांना मतदान चिठ्ठी मिळाली नाही, त्यांनी या संधीचा फायदा घेऊन ती प्राप्त करावी, असे आवाहन तहसीलदार महेश शेवाळे यांनी केले. (प्रतिनिधी)