अंबिकानगरात सिमेंट रस्त्याचा लोकार्पण सोहळा

By Admin | Updated: July 20, 2014 01:04 IST2014-07-20T00:48:48+5:302014-07-20T01:04:12+5:30

औरंगाबाद : वॉर्ड क्र. ८० अंबिकानगर- राजीव गांधीनगर येथील सिमेंट रस्त्याचा लोकार्पण सोहळा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला

Cemetery celebration ceremony in Ambikanagar | अंबिकानगरात सिमेंट रस्त्याचा लोकार्पण सोहळा

अंबिकानगरात सिमेंट रस्त्याचा लोकार्पण सोहळा

औरंगाबाद : वॉर्ड क्र. ८० अंबिकानगर- राजीव गांधीनगर येथील सिमेंट रस्त्याचा लोकार्पण सोहळा औरंगाबाद पूर्वचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला, तसेच वॉर्ड क्र. ८१ जयभवानीनगर येथील गल्ली नं.१२ मध्ये ड्रेनेज लाईनचे व वॉर्ड क्र. ४५ रहेमानिया कॉलनीतील वैशालीनगर- यशोधरा कॉलनीतील ड्रेनेज लाईनचे उद्घाटनही करण्यात आले. ढोल- ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत राजेंद्र दर्डा यांचे जोरदार स्वागत करून तेथील नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला. ही सारी कामे स्वत: राजेंद्र दर्डा यांच्या आमदार निधीतून करण्यात आली.
स्वत:चा निधी, आपले मोठे बंधू विजय दर्डा यांचा खासदार निधी, मुख्यमंत्र्यांचा निधी, तर कधी विशेष निधीतून मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्याच्या राजेंद्र दर्डा यांच्या या शैलीवर जनता प्रचंड खुश असून त्याबद्दल ते समाधान व्यक्त करीत आहेत. एवढी कामे ना महापालिकेच्या माध्यमातून होत आहेत, ना नगरसेवक आपला निधी वापरून करीत आहेत. राजेंद्र दर्डा यांच्या जिद्दीची व चिकाटीची, तसेच विकासकार्याच्या ध्यासाबद्दल मात्र सर्वत्र चांगली चर्चा ऐकावयास मिळत आहे. राजीव गांधीनगर येथील कार्यक्रमास सा.बां.चे उपअभियंता ए.डी. घेवारे व शाखा अभियंता एस.बी. वाळवेकर, भाऊसाहेब जगताप, मगरे दाजी, दामूअण्णा शिंदे, मुश्ताक खान, किरण पाटील, मतीन अहमद, रवी केदारे, राजुकमार जैन, पांचाळकाका, प्रकाश डंबाळे, लक्ष्मण गोरे यांच्यासह शेकडो स्त्री- पुरुष नागरिकांची उपस्थिती होती. गल्ली नं १२ मधील कार्यक्रमास भागवत भारती, बाळूनाना शिंदे, संदीप शिंदे, काळुबा गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
वॉर्ड क्र. ४५ रेहमानिया कॉलनीतील यशोधरा सामाजिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नगरसेवक रमजानी यांच्या हस्ते येथील ड्रेनेज लाईनचे उद्घाटन करण्यात आले.
याचठिकाणी विजय दर्डा यांच्या खासदार निधीतून भव्य सामाजिक सभागृह बांधून देण्यात आले असून त्याचा आता खूप चांगला उपयोग होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी यशोधरा महिला मंडळाच्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सोनू नरवडे, मधुकर भोळे, संगीता पाखरे, पी.जी. गायकवाड, सी.पी. पगारे, नामदेव गजहंस, नीतेश मेश्राम, सलीम पठाण, इब्राहीमभय्या पटेल, सय्यद शफिक आदींसह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Cemetery celebration ceremony in Ambikanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.