जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी

By Admin | Updated: July 30, 2014 00:50 IST2014-07-30T00:11:18+5:302014-07-30T00:50:02+5:30

लातूर : जिल्ह्यात उदगीर, निलंगा, औसा, अहमदपूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट आदी ठिकाणच्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून

Celebrating the Ramadan Id in the district | जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी

जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी

लातूर : जिल्ह्यात उदगीर, निलंगा, औसा, अहमदपूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट आदी ठिकाणच्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून वरूणराजाकडे पावसाची दुआ मागुन जिल्ह्यात रमजान ईद हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली़
उदगीर : उदगीर येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला़ यावेळी उदगीर शहर व परिसरातील हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते़
औसा : शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली़ यानिमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या़
शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली़ औशाचे मुख्य काजी मीर हाशमतअली यांनी नमाज पढविली तर शहरातील जलालशाही मस्जीदमध्ये सकाळी ९ वाजता, नक्षबंधी पीठाधीश मौलाना अमजद सिद्दीकी यांच्या उपस्थितीत ईदची नमाज झाली़
ईदगाह मैदानावरील सामुदायिक नमाज झाल्यानंतर औश्याचे आ़बसवराज पाटील यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या़ यावेळी माजी नगराध्यक्ष संगमेश्र्वर ठेसे, सुनील मिटकरी, राजेश्वर बुके, बसवराज वळसंगे, सिद्राप्पा मिटकरी, प्रा़महंमद हतीफ आलुरे, युसूफ पटेल, सुरेश सूर्यवंशी, नारायणआबा लोखंडे, बालाजी कांबळे, सुभाषप्पा मुक्ता, अमरसिंह भोसले, अमोल दुधनकर, संतोष मुक्ता, तहसीलदार दत्ता भास्कर, मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील आदींची उपस्थिती होती़
कासार बालकुंदा : निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी केली़ या सणाला गावातील सर्व बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन स्वागत केले़ त्या ईदनिमित्त गावचे पोलिस पाटील संदीप पाटील, माजी सभापती हालप्पा कोकणे, फत्यामत्त शेख, ह़भ़प़मारूती महाराज, हैदर चौधरी, उस्मान चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या़
अहमदपूर : येथील इदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या़ यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़
निटूर : निलंगा तालुक्यातील निटूर मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर नमाज अदा केली़ यावेळी हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़
देवणी : देवणी येथे मंगळवारी मुस्लिम बांधवांनी ईद उल फित्र मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली़
ईद निमित्त येथील इदगाह मैदानावर सकाळी नमाज अदा करण्यात आली़ ही नमाज नइम मौलाना विजयनगरकर यांन अदा केली़ नमाजानंतर मानव जातीच्या शांततेसाठी व कल्याणासाठी सर्व बांधवातर्फे दुआ करण्यात आली़ यावेळी जि़प़सदस्य दिलीप पाटील नागराळकर, सरपंच देविदास पतंगे, उपसभापती यशवंत पाटील, प्रा़अनिल इंगोले, प्रा़अजित बेळकोणे, बालाजी कारभारी, वैजनाथ लुल्ले, मनसे तालुकाध्यक्ष विकास कोतवाल, सोमनाथ कलशेट्टे, राजकुमार जिवने, वसंत कांबळे, पोलिस निरीक्षक व्ही़एमक़ेंद्रे, मंडळअधिकारी पाटील, तलाठी अनिल चामले यांच्यासह हिंदू व मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती होती़ होते़ ईद निमित्त दिवसभर हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा दिल्या़
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील तुरुकवाडी येथे मंगळवारी मौलवी वजीर पटेल यांच्या उपस्थितीत सामूहिक नमाज अदा करण्यात आली़ यावेळी महेताब शेख, चॉंद पटेल, हैैदर पटेल, रसूल पटेल, आयुब शेख, इकबाल शेख यांच्यासह मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती़ (वार्ताहरांकडून)

 

Web Title: Celebrating the Ramadan Id in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.