शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

मानूर येथे पट्टाभिषेक सोहळा उत्साहात

By admin | Updated: August 18, 2016 00:57 IST

राजेश खराडे , बीड जय...शिवा...हर...हर महादेव च्या जयघोषाने तब्बल चार वर्षानंतर मनूर येथील देवस्थान दुमदुमले होते. न्यायालयीन वाद मिटल्यानंतर नागेश विश्वनाथ पुराणिक यांची

राजेश खराडे , बीडजय...शिवा...हर...हर महादेव च्या जयघोषाने तब्बल चार वर्षानंतर मनूर येथील देवस्थान दुमदुमले होते. न्यायालयीन वाद मिटल्यानंतर नागेश विश्वनाथ पुराणिक यांची मठाधिपती म्हणून निवड करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. श्रावण महिन्याचे औचित्य साधले. बुधवारी मंदिर परिसरात राजयोग साधून पट्टाभिषेक करण्यात आला. मठसंस्थानचे उत्तराधिकार बहाल करून गुरू गिरी शिवाचार्य मानूरकर महाराज म्हणून त्यांचे नामकरण करण्यात आले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी पहाटे ६ वा. पासून मानूर देवस्थानात पट्टाभिषकास सुरवात झाली होती. शिवाचार्य मांढकेर महाराज यांच्या गुरू साक्षीने व शिवलिंग शिवाचार्य महाराज बेंगळीकर यांच्या गुरूतत्वात हा अभिषेक पार पडला. नागेश पुराणिक महराज यांची जय...शिवा...हर. ..हर... महादेवच्या जघोषात मानूर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. कीर्तन, प्रवचन व महिलांच्या डोक्यावरील कलशाने लक्ष वेधले होते. पट्टाभिषेकाचा विधी उरकल्यानंतर मंदिर परिसरातच शंखनादाने धर्मसभेला सुरवात झाली होती. यावेळी धर्मगुरू-शिवाचार्य, मानूर मठाचे शिष्य, शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री. सुरेश धस, जयदत्त धस, जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर, संजय गिराम, तालुकाध्यक्ष प्रवीण शेटे, उमाकांत शेटे, वैजिनाथ काळकर, शैलेश जगापूरे, प्रकाश स्वामी, संध्या तोछकर, अरूण लथे, रोहिदास पाटील, सरपंच विठ्ठल वनवे, संजय गाढवे यांच्यासह इतर जिल्ह्यातून व परराज्यातील वीरशैव समाजाचे भाविक उपस्थित होते. यावेळी शिवा संघटनेचे अध्यक्ष म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर मठाच्या विकासाला योग्य दिशा मिळणार आहे. गावकऱ्यांचे मतपरिवर्तन झाले ही मोठी बाब आहे. राज्यातील ३५० मठापैकी बीड जिल्ह्यात कपिलधार येथे मन्मथ स्वामी यांची समाधी असून मानूर येथे त्यांचेच गुरूगड असल्याने जिल्ह्याचे मोठे भाग्य आहे. गत पाचवर्षात विकास कामांना बसलेली खिळ आता मोडीत काढून कामाला लागायचे आहे. वीरशैव समाजांच्या तत्वांची अंमलबजावणी करून शिवा संघटना काम करीत आहे. येथील मठाकरिता गुरूवर्य परंडकर महाराज व गुरू गिरी शिवाचार्य महाराज यांचे मोठे योगदान राहिले आहे. आता विरपक्ष शिवाचार्य नागेश महाराज यांच्या रुपाने मठाधिपती लाभले असून पुर्वजांची उणिव भासू देणार नाहीत. महाराजांच्या प्रत्येक निर्णयामागे शिवा संघअना एक ढाल म्हणून कार्यरत राहणार असल्याचे यावेळी प्रा. धोंडे यांनी सांगून शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. आ. जयदत्त क्षीरसागर यांनी मानूर मठाची महती सांगितली. न्यायालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण वाद मिटल असून येथील मठाच्या गुरूघराची सबंध देशात चर्चा असल्याचे सांगितले. आता भाविक आणि देवस्थानाचा धागा मजबूत करणे गरजेचे आहे. ते म्हणाले की, देवस्थानची फसवणूक केल्यास कशी काटाला लागते हे आपणाला माहिती आहेच. त्यामुळे आगामी चांगली भावना ठेऊनच काम करण्याचा सूचक सल्ला त्यांनी दिला. माजी मंत्री सुरेश धस यांनी गत पाच वर्षात मठाची झालेली दुरवस्था मांडली. दरम्यानच्या घटना ह्या गैरसमजुतीमधून झाल्या होत्या. त्याबद्दल धस यांनी जाहिर माफी मागून पुन्हा मठाच्या विकासाबाबत आशा व्यक्त केली. शिवाचार्य बेळंकीकर महराज, शिवाचार्य माढेकर महाराज आदींनी मनोगत व्यक्त करून गुरूगिरी शिवाचार्य नागेश महाराज यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. धर्मसभेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.