गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सीसीटीव्हीचा उपयोग व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:05 IST2021-07-18T04:05:42+5:302021-07-18T04:05:42+5:30
बलदेव सिंग यांनी शुक्रवारी स्मार्ट सिटीची बैठक घेतली. शनिवारी त्यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी स्मार्ट सीटीचे सीईओ आस्तिक ...

गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सीसीटीव्हीचा उपयोग व्हावा
बलदेव सिंग यांनी शुक्रवारी स्मार्ट सिटीची बैठक घेतली. शनिवारी त्यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी स्मार्ट सीटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लि. (एआयटीएल)चे कार्यकारी संचालक ए. एस. रंगा नाईक, एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे आणि उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी पोलीस मुख्यालयातील स्मार्ट सिटी कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटरच्या कामाचा आढावा घेतला. सेंटरमधील अत्याधुनिक यंत्रणेचे सिंग यांनी कौतुक केले. तसेच संशयित व्यक्तींचा शोध, घुसखोरी टाळण्यासाठी, गर्दी रोखण्यासाठी, व्हिडिओ विश्लेषणाच्या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रभावीपणे वापरली पाहिजेत, असे निर्देश दिले. डिजिटल आउटडोअर डिस्प्ले, विविध सेन्सरद्वारे मिळालेला पर्यावरणविषयक डेटा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला द्यावा. एएससीडीसीएलचे फैज अली, स्नेहा नायर, आदी उपस्थित होते. आर्किटेक्ट स्नेहा बक्षी यांनी काळा दरवाजा, खिजरी गेटच्या नूतणीकरणासंदर्भात माहिती दिली. ऐतिहासिक दरवाजांचे काम योग्य प्रकारे करावे, असेही त्यांनी नमूद केले. स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल, लव्ह सिटी ऑफ गेट्स, शहर बसचे स्टॉप, आदी प्रकल्पांना त्यांनी भेट दिली.