सीसीटिव्हींचा उडाला बोजवारा

By Admin | Updated: January 14, 2015 00:56 IST2015-01-14T00:33:15+5:302015-01-14T00:56:24+5:30

संजय कुलकर्णी ,जालना जिल्हा नियोजन व विकास समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेद्वारे शहरात ३५ चौकांमध्ये बसविण्यात येणाऱ्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या कामाचा बोजवारा उडाला आहे.

CCTV footage will be destroyed | सीसीटिव्हींचा उडाला बोजवारा

सीसीटिव्हींचा उडाला बोजवारा


संजय कुलकर्णी ,जालना
जिल्हा नियोजन व विकास समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेद्वारे शहरात ३५ चौकांमध्ये बसविण्यात येणाऱ्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. सहा महिन्यांच्या मुदतीचे हे काम साडेचार महिन्यानंतर २५ टक्केही झालेले नाही.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग घेत ३५ चौकांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे ७० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी ४६ लाख ९८ हजार ३३० रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली. जालना नगरपालिका व पोलिस अधीक्षक कार्यालय अशा दोन्ही कार्यालयांनी मिळून हे काम पूर्ण करावे, असे ठरले. या दोन्ही कार्यालयांसाठी ही तरतूद होती. आॅगस्ट २०१४ मध्ये नगरपालिकेने हे काम निविदा काढून एका एजन्सीकडे सोपविले. या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला. त्यानुसार २८ फेब्रुवारी २०१५ रोजी या कामाची मुदत संपणार आहे. परंतु गेल्या साडेचार महिन्यांच्या काळात ३५ पैकी केवळ सहाच चौकांमध्ये हे कॅमेरे लावण्यात आले. अत्यंत संथ गतीने हे काम सुरू असल्याने ते पूर्णत्वास केव्हा जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पालिकेकडून प्रतिसाद नाही
पालिकेमार्फत निविदा काढून सुरू झालेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची कामे मुदतीत पूर्ण व्हावीत, याचा पाठपुरावा मात्र पोलीस प्रशासनाला करावा लागत आहे. आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत २५ टक्के देखील काम पूर्ण झाले नाही. पालिकेचा पाठपुरावाच कमी पडत असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. याबाबत पालिका मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे म्हणाले की, काही तांत्रिक बाबींमुळे या कामास अडचणी आल्या. परंतु सीसीटिव्ही बसविण्याचे काम २६ जानेवारीपूर्वी पूर्ण होईल. प्रजासत्ताकदिनी उद्घाटन करण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.


बसस्थानक ते गांधीचमन, बसस्थानक ते शनिमंदिर, रेल्वेस्थानक ते बसस्थानक, रेल्वेस्थानक ते अलंकार, शनिमंदिर ते मोतीबाग, फुलबाजार ते पाणीवेस, सराफा ते शिवाजीपुतळा, सिंधीबाजार ते देऊळगावराजा रोड, मंठा चौफुली ते दुर्गामाता रोड, शनिमंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वेस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील टप्पेवाहतूक पूर्णपणे बंद होती.

Web Title: CCTV footage will be destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.