शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण कार्यालयावर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: September 21, 2014 00:35 IST

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील आरक्षण कार्यालयात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील आरक्षण कार्यालयात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आरक्षण कार्यालयात वाढलेल्या दलालांवर यापुढे नियंत्रण येणार आहे. शिवाय या ठिकाणी तात्काळ तिकिटांसाठी होणारा गैरप्रकारही लवकरच बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आगामी काळात सुरक्षेबरोबर कार्यालयातील हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पहिल्या टप्प्यात भव्य इमारत बांधण्यात आली. या ठिकाणी कामकाजही सुरू झाले. रेल्वेस्थानकाच्या जुन्या इमारतीत ९ सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत. मात्र, मॉडेल रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीबरोबर आरक्षण कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असताना गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण मध्य रेल्वेचे त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यातही रेल्वेस्थानकाच्या आरक्षण कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा नसल्याने गेल्या काही महिन्यांत अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ सर्वसामान्य प्रवाशांबरोबर कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर येत होती. वारंवार मागणी करूनही या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ तिकिटांसाठी होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी व दलालांवर नियंत्रण आणताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. याशिवाय अधिकाऱ्यांनी नाहक त्रास देत आपण तिकिटासाठी अधिक पैसे घेत असल्याची तक्रार देण्यासाठी प्रवाशांवरही दबाब आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कार्यालयातील कर्मचाऱ्याने केला, तर या आरोपात काही तथ्य नसल्याचे सदर अधिकाऱ्याने म्हटले होते. अशा प्रकारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून एकमेकांवर होणाऱ्या आरोपांत किती तथ्य आहे, हेदेखील सीसीटीव्ही कॅ मेऱ्यामुळे समोर येण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. आरक्षण कार्यालयात शुक्रवारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर वायरिंगचे काम झाले. शनिवारी कार्यालयात तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, लवकरच उर्वरित कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आगामी काळात कार्यालयातील कामकाजावर लक्ष राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर आता त्याद्वारे थेट नांदेड येथील विभागीय अधिकाऱ्यांनाही आरक्षण कार्यालयातील हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरक्षण कार्यालयाबरोबर कार्यालयाबाहेर लागणाऱ्या रांगांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जवळपास ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.