एटीएम कार्डची अदलाबदल करून फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:19 IST2019-01-30T23:18:52+5:302019-01-30T23:19:18+5:30
सीडीएम मशीनद्वारे पैसे टाकण्यास मदतीची बतावणी करून एका जोडप्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून मजुराच्या बँक खात्यातील ३२ हजार ६०० रुपये परस्पर काढून घेतले. या फसवणूकप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसविले
औरंगाबाद : सीडीएम मशीनद्वारे पैसे टाकण्यास मदतीची बतावणी करून एका जोडप्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून मजुराच्या बँक खात्यातील ३२ हजार ६०० रुपये परस्पर काढून घेतले. या फसवणूकप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
नरेंद्र कचरू शिरसाठ (४७, रा. नागसेननगर, उस्मानपुरा) हे २८ जानेवारी रोजी दशमेशनगर येथील एटीएम सेंटरवर पैसे टाकण्यासाठी गेले होते. तेथे उभ्या तरुण आणि तरुणीने त्यांना पैसे टाकण्यासाठी मदत करतो, असे म्हणाले. तेव्हा नरेंद्र यांनी त्यांचे एटीएम कार्ड तरुणाकडे दिले. सीडीएममध्ये पैसे टाकल्यानंतर आरोपींनी कार्डची अदलाबदल करून दुसरेच कार्ड नरेंद्र यांना दिले. नरेंद्र यांच्या एटीएम कार्ड आणि पासवर्डच्या आधारे दुसऱ्या एटीएममधून ३२ हजार ६०० रुपये काढून घेतले. ही बाब समजताच नरेंद्र यांनी उस्मानपुरा ठाण्यात आरोपी जोडप्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक सानप तपास करीत आहेत.
------