शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:33 IST

Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Election 2026: "जुन्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का?" तिकीट नाकारल्याने भाजपच्या रणरागिणींचा प्रचार कार्यालयात राडा

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून भाजपमधील अंतर्गत खदखद आता चव्हाट्यावर आली आहे. प्रभाग २० मधील इच्छूक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांनी तिकीट नाकारल्याने आज भाजपच्या प्रचार कार्यालयात नेत्यांना अक्षरशः धारेवर धरले. "१८ वर्षे पक्षाचे काम केले, १८ केसेस अंगावर घेतल्या, पण आज १५ दिवसांपूर्वी आलेल्यांना तिकीट दिले जात आहे," असा संताप व्यक्त करत दिव्या मराठे यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर हल्लाबोल केला.

निष्ठावंतांची अवहेलना? दिव्या मराठे यांनी यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यावर अन्यायाचा थेट आरोप केला. त्या म्हणाल्या, "जेव्हा पक्ष कठीण काळात होता, तेव्हा माझी मुले लहान असतानाही मी घरादाराचा विचार न करता पक्षाचे काम केले. आज पक्ष एक नंबरवर आल्यावर आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. नेत्यांच्या बायका एसीमध्ये बसतात आणि कार्यकर्त्या महिलांनी मात्र रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा का?" असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आमरण उपोषणाचा इशारा केवळ दिव्या मराठेच नव्हे, तर भाजपमधील अनेक महिला कार्यकर्त्यांमध्ये या उमेदवारी वाटपावरून नाराजी असल्याचे चित्र आहे. "मी रडणार नाही, तर या अन्यायाविरोधात लढणार आहे. मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असून थेट पक्ष कार्यालयातच आमरण उपोषणाला बसणार आहे," असा इशाराही त्यांनी दिला. 

अनेक नाराज पदाधिकारी प्रचार कार्यालयात धडकलेदिव्या मराठे यांच्या सारखेच अनेक निष्ठावान कार्यकर्ते तिकीट नाकरल्याने नाराज होऊन प्रचार कार्यालयात धडकत आहेत. भाजपचे स्थानिक नेत्यांना जाब विचारण्याचा पवित्र्यात आलेल्या या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.  नुकत्याच पक्षात आलेल्या आणि कोणताही अनुभव नसलेल्यांना तिकीट देण्यात प्राधान्य दिल्याने भाजपमध्ये पुन्हा एकदा 'निष्ठावान' विरुद्ध 'आयात' या वादाची ठिणगी पडली आहे. अनेक जुने कार्यकर्ते नाराज असल्याने याचा परिणाम निकालावर होऊ शकतो अशी चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Workers' Fury Over Ticket Distribution in Sambhajinagar

Web Summary : BJP functionaries in Sambhajinagar protested ticket distribution, alleging neglect of loyalists. Divya Marathe, denied a ticket after 18 years of service, accused leaders of favoritism and threatened indefinite hunger strike, sparking internal strife and raising concerns about election impact.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपा