पैशांसाठी छळ करणाऱ्या सासरकडील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:04 IST2021-03-26T04:04:17+5:302021-03-26T04:04:17+5:30

वैजापूर येथील शास्त्रीनगरात राहणारी कल्याणी (२५) हिचा २०१७ मध्ये नांदगाव येथील अमोल प्रकाश खैरनार यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर ...

A case has been registered against five persons from the father-in-law for harassing them for money | पैशांसाठी छळ करणाऱ्या सासरकडील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

पैशांसाठी छळ करणाऱ्या सासरकडील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

वैजापूर येथील शास्त्रीनगरात राहणारी कल्याणी (२५) हिचा २०१७ मध्ये नांदगाव येथील अमोल प्रकाश खैरनार यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर सहा महिन्यांनी तुला स्वयंपाक येत नाही, तू काळी आहेस, यासह अन्य कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करीत त्रास देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही वर्षांनी तुला मूलबाळ होत नाही. तू काही कामाची नाही, असे म्हणून सातत्याने हिणविले जात असे. त्यात कार घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी सातत्याने केली जात होती. माहेरकडील परिस्थिती बेताची असल्याने कल्याणी पतीची इच्छा पूर्ण करू शकली नाही. पैशासाठी तिला सातत्याने मारहाण केली जात होती. अखेर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन घराबाहेर हाकलून दिले. याप्रकरणी कल्याणी हिने दिलेल्या फिर्यादीवरून पती अमोल प्रकाश खैरनार, सासू मंगल प्रकाश खैरनार, नणंद चैताली संदीप दराडे (रा.गाजरवाडी), रूपाली संतोष जेजूरकर (रा.शिर्डी) या पाच जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A case has been registered against five persons from the father-in-law for harassing them for money